बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने त्याचा 49 वा वाढदिवस 5 फेब्रुवारीला साजरा केला आहे. वाढदिवसानिमित्त अभिनेत्री ऐश्वर्या रायने एक इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलीय. ज्यामध्ये ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनचा लहानपणीचा जुना फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच तिने त्याला आनंद, चांगले आरोग्य, प्रेम मिळो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना आळा बसला आहे. चाहत्यांनी ऐश्वर्या रायच्या पोस्टवर हॉर्ट इमोजींचा वर्षाव केला आहे.
चाहत्यांनी केली निम्रत कौरची माफी मागण्याची मागणी
दरम्यान, काही चाहत्यांनी कमेंट्स करून घटस्फोटित कुठे गेले? असा देखील प्रश्न विचारला आहे. तर एकाने या दोघांच्या आयुष्यात 'समस्या'असल्याच्या अफवा कोणी पसरवल्या अशा देखील कमेंट्स केल्या आहेत. तर काही चाहत्यांनी निम्रत कौरची माफी मागावी अशी मागणी केली आहे. कारण तिचे नाव या प्रकरणात ओढले गेले होते. अभिषेक बच्चनचा लहानपणीचा एक जुना फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मजबूत नात्याची खात्री पटवून दिली आहे.
ऐश्वर्या रायच्या या पोस्टनंतर चाहत्यांना खात्री पटली आहे की दोघांच्या घटस्फोटांच्या बातम्या या निराधार असून त्या फक्त अफवा आहेत. त्यामुळे चाहत्यांनी कमेंट करून निम्रत कौरला माफ करा. तर दुसऱ्याने तुम्ही निमरत कौरची माफी मागितली पाहिजे अशा कमेंट्स केल्या आहेत. तर काही लोकांनी दोघांच्या कथित घटस्फोटाबद्दल अंदाज लावणाऱ्यांची खिल्ली उडवली आहे.
तर काही चाहत्यांनी लोकांच्या असे देखील निदर्शनास आणून दिले की सोशल मीडियावर 14.6 मिलियन फॉलोअर्स असलेल्या ऐश्वर्या रायने इन्स्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो केलं आहे. ते म्हणजे तिचा पती अभिषेक बच्चन. यावरूनच समजते की दोघांमध्ये कोणताही वाद नाहीये.