VIDEO : पापाराझींसमोर कशी पोझ द्यायची? होणाऱ्या वहिनीला प्रियांका चोप्राकडून स्मार्ट टिप्स

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राचा आणि नीलमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 7, 2025, 01:46 PM IST
VIDEO : पापाराझींसमोर कशी पोझ द्यायची? होणाऱ्या वहिनीला प्रियांका चोप्राकडून स्मार्ट टिप्स title=
(Photo Credit : Social Media)

Priyanka Chopra : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे दोघे नुकतेच मुंबईत आले आहे. त्यांचं मुंबईत येण्याचं कारण प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचं लग्न आहे. त्या दोघांच्या संगीतचा कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक व्हिडीओ हा सिद्धार्थची होणारी बायको नीलम उपाध्याय आणि प्रियांकाचा आहे. त्या व्हिडीओला पाहून नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. 

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. सुरुवातीला प्रियांका नीलमला म्हणाली की तू खूप सुंदर दिसतेस. त्यानंतर तिनं नीलमचे केस आणि ड्रेस ठीक केला. याशिवाय पापाराझींसमोर कशी पोज द्यायची हे देखील प्रियांकानं नीलमला शिकवलं. व्हिडीओत पाहायाला मिळत आहे की निक जोनसनं नीलम आणि सिद्धार्थला मिठी मारली. प्रियांकानं त्यानंतर नीलमला मिठी मारली आणि तिच्याशी गप्पा मारल्या. यावेळी प्रियांकानं निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर नीलमनं सिल्वर रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. निक यावेळी प्रियांकाला मॅच करत निळ्या शेरवानीमध्ये दिसला तर सिद्धार्थनं गडद निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

प्रियांकाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'आपण जेव्हा आपल्या भावावर जिवापाड प्रेम करतो तेव्हा आपल्या वहिणीसाठी आपण काहीही करू शकतो.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ज्या प्रकारे प्रियांकानं नीलमचा ड्रेस नीट केला ते पाहून मला फार आनंद झाला.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मुली भावावर इतकं प्रेम करतात की त्याच्यासाठी काहीही करू शकतात.' 

हेही वाचा : 'मीठ, लिंबू, कापूर आणि...' गोव‍िंदाच्या बाल्कनीमध्ये अशा गोष्टी का ठेवते पत्नी सुनीता? स्वत: केला खुलासा

सिद्धार्थ आणि नीलमच्या लग्नाची चर्चा गेल्या बऱ्याच काळापासून सुरु आहे. गेल्यावर्षी अर्थात ऑगस्ट 2024 मध्ये त्यांचं लग्न झालं. दरम्यान, आज शुक्रवारी ते दोघं मुंबईतच लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.