Apoorva Mukhija Controversy: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. त्याने अलीकडेच स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमध्ये भाग घेतला होता. हा शो त्याच्या वादग्रस्त आणि बोल्ड कॉमेडी कंटेंटसाठी ओळखला जातो. यामुळे रणवीर अलाहबादियासह सर्व पाहुण्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या पाहुण्यांच्या रांगेत एक तरुणी होती, जी तिच्या बोल्ड विधानांनी सुरुवातीपासून साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. अपूर्वा मखीजा असं या तरुणीचं नाव असून ती स्वत:ला रिबेल किड उर्फ कलेशी औरत म्हणवून घेते. तिच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
गेल्या काही दिवसांपासून 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोवरुन उलटसुलट चर्चा सुरु आहेत. या शोमध्ये असं काहीतरी घडतं ज्यामुळे तो शो वादाचा विषय बनतो. या शोमध्ये कधी अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नैराश्याची खिल्ली उडवली जाते तर कधी पालकांना शिवीगाळ करून त्यांची खिल्ली उडवली जाते. या शोमध्ये जे काही घडले त्यावर संपूर्ण देश एक झाला आणि त्यांनी शोवर कारवाईची मागणी केली. पुढे या शोवर कारवाईदेखील करण्यात आली. पॅनेलच्या 5 निर्मात्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला. याच शोमध्ये अश्लील विधानांच्या सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या अपूर्वा मखीजाबद्दल जाणून घेऊया.
अपूर्वा मखीजा स्वत:ला कलेशी औरत म्हणते. तिने समय रैनाच्या शोमधील स्पर्धकांसोबत बोलताना त्याच्या आईच्या गुप्तांगांचा उल्लेख केला होता. त्याच्या भावी जोडीदाराच्या गुप्तांगांबद्दलही घृणास्पद गोष्टी केल्या होत्या. यानंतर तिच्यावर सर्व बाजूंनी टीका केली जातेय.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे नाव 'रिबेल किड' असे लिहिले आहे. या नावाचा अर्थ बंडखोर मूलं असा होतो. फोर्ब्सच्या टॉप १०० डिजिटल क्रिएटर्सच्या यादीत तिचे नाव समाविष्ट आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे 2.6 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. कोरोना काळात अपूर्वा प्रसिद्धीच्या झोतात आली. ती फॅशन रील्स बनवायची आणि नंतर त्यातून पैसा मिळू लागल्यानंतर पूर्णवेळ कंटेंट क्रिएशन करू लागली.
अपूर्वा कंटेट क्रिएट करताना अपशब्द वापरते आणि धाडसीपणे बोलते. तिने अनेक मोठ्या ब्रँडसोबत काम केले आहे. या यादीत वन प्लस, नेटफ्लिक्स आणि अगदी गुगलचाही समावेश आहे. अपूर्वा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सोशल मीडियावर तिला इब्राहिम अली खान, महिमा चौधरी, भूमी पेडणेकर, आस्था गिल, करण कुंद्रा, अर्जुन कपूर, जन्नत झुबेर, झील मेहता, फुकरा इन्सान आणि इतर प्रसिद्ध लोक असे मोठे स्टार फॉलो करतात.
अपूर्वाची आई अनिता मुखिजा व्यवसायाने शिक्षिका आहे आणि तिला एक भाऊ असून तो तिच्यापेक्षा लहान आहे. अपूर्वाने तिचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलंय. 2023 मध्ये तिने 'हू इज युअर गायनॅक' या वेब सिरीजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि 2024 मध्ये तिने डिझायनर तरुण ताहिलियानी यांच्या कलेक्शनच्या लाँचसाठी रॅम्प वॉक केला. दिल्ली विद्यापीठातील एका विद्यार्थ्याला उघडपणे हाडे मोडण्याची धमकी दिली होती. या भांडणानंतर अपूर्वा पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आली.