World's Longest Car: हेलिपॅड, स्विमिंग पूल आणि मिनी गोल्फ कोर्स असलेली कार, जाणून घ्या 1 तासाचं भाडं

जगातील सर्वाधिक लांबीची कार अमेरिकन ड्रीम म्हणून ओळखली जाते. 1986 मध्ये, ही कार जगातील सर्वात लांब कार म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदली गेली.

Updated: Nov 21, 2021, 08:07 PM IST
World's Longest Car: हेलिपॅड, स्विमिंग पूल आणि मिनी गोल्फ कोर्स असलेली कार, जाणून घ्या 1 तासाचं भाडं title=

World's Longest Car : जर तुम्हाला वाहनांची आवड असेल, तर साहजिकच तुम्हाला कधीतरी असा प्रश्न पडला असेल की, जगातील सर्वाधिक लांबीची कार कोणती आहे, ती कशी असेल, जगातील सर्वात लांब कारमध्ये कोणत्या सुविधा असतील आणि इतर अनेक प्रश्न तुमच्याही मनात आले असतीलच. 

अमेरिकन ड्रीम कार (American Dream Car)
जगातील सर्वात लांबीची कार अमेरिकन ड्रीम म्हणून ओळखली जाते. 1986 मध्ये, ही कार जगातील सर्वात लांब कार म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदली गेली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अमेरिकन ड्रीम कारची लांबी 100 फूट होती, जी एखाद्या टायर असलेल्या ट्रेनसारखी दिसत होती.

हेलीपॅड स्विमिंग पूल और मिनी गोल्फ कोर्स 
अमेरिकन ड्रीम फक्त तिच्या लांबीसाठी ओळखली जात नव्हती, तर  त्या कारमध्ये असलेल्या सुविधांमुळेही ती सर्वांच्या आकर्षणाचा विषय होती. कारच्यावर वैयक्तिक हेलिपॅड, मिनी गोल्फ कोर्स आणि स्विमिंग पूल होता. याशिवाय कारमध्ये बाथटब, जाकूझी, टीव्ही, फ्रीज, टेलिफोन या सुविधाही होत्या. इतकंच नाही तर कारमध्ये एकाच वेळी 70 लोक बसू शकत होते. 

कारला २६ टायर
अमेरिकन ड्रीम कारला एकूण 26 चाके होती आणि ती दोन्ही बाजूंनी चालवता येत होती. विशेष बाब म्हणजे ती कोणत्याही कार निर्माता कंपनीने बनवली नाही. त्याचे डिझायनर जे ओहरबर्ग होते. Jay Oherberg हा हॉलिवूड चित्रपटांचा सुप्रसिद्ध वाहन डिझायनर होता आणि त्याला कारची आवड होती. त्यांनी ही कार 1980 मध्ये 1976 च्या कॅडिलॅक एल्डोराडो लिमोझिनवर आधारीत बनवली होती.

कार बनवण्यासाठी लागली अनेक वर्ष
कारच्या दोन्ही बाजूंना V8 इंजिन बसवण्यात आलं होतं. ही कार तयार होण्यासाठी आणि प्रत्यक्ष रस्त्यावर येण्यासाठी जे ओहरबर्गला सुमारे 12 वर्षे लागली. यानंतर कार रस्त्यांवर आली आणि जगातील सर्वात लांब कार  म्हणून तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

अमेरिकन ड्रीमचं भाडं
ही कार चित्रपटांमध्ये वापरण्यासाठी बनवली गेली होती. त्यानंतर ही गाडी भाड्याने दिली जाऊ लागली. त्याचं भाडे प्रति तास $ 50 ते $ 200 होतं, जे भारतीय चलनात सुमारे 15 हजार रुपयांपर्यंत जातं.