सोशल मीडिया म्हटलं तर तिथे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. तर काही व्हिडीओ पाहून थोड्या क्षणासाठी आपल्या ह्रदयाचे ठोकेच थांबतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक नैसर्गित आपत्ती कैद झाली असून, पर्यटक थोडक्यात बचावले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्यचकित झाले असून, बोटं तोंडात घालत आहेत.
ब्रिटनमधील डोरसेटच्या वेस्ट बे येथे 150 फूट उंच खडकाचा एक भाग कोसळला. दरम्यान हा खडक कोसळत होता तेव्हा तिथे काही पर्यटकही उभे होते. पण सुदैवाने ते बचावले आहेत. अन्यथा ते मलब्याखाली गाडले गेले असते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
डोरसेट काऊन्सिलनेही आपल्या ट्विटर हँडलला हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कोणत्याही क्षणी खडक कोसळण्याचा किंवा भूस्खलन होण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, सुरक्षेची खबरदारी म्हणून काउंसिलने खडकाच्या वरचा दक्षिण पश्चिम किनारपट्टीचा मार्ग तात्पुरता बंद केला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांनी कोसळणारा खडक पाहिला आणि वेळीच आपला जीव वाचवला.
Rockfalls and Landslips can happen at anytime. These people had a lucky escape. The South West Coast Path above the cliff at West Bay is currently closed. Thanks to Daniel Knagg for the footage.#Westbay #JurassicCoast pic.twitter.com/38XJjSoBYT
— Dorset Council UK (@DorsetCouncilUK) August 10, 2023
व्हिडीओत दिसत आहे त्याप्रमाणे अनेक पर्यटक त्या खडकासमोर उभं राहत या ऐतिहासिक वास्तूचे फोटो, व्हिडीओ काढत होते. त्याचवेळी खडकाचा काही भाग कोसळू लागले. सुरुवातीला छोटी दगडं पडतात आणि नंतर मात्र एक मोठा भाग वेगाने खाली कोसळतो. पर्यटकांनाही मोठ संकट येत असल्याचं लक्षात येतं आणि ते सुरक्षित ठिकाणी धावण्यास सुरुवात करतात.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. यामधील काहींनी काऊन्सिलच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांवर नाराजी जाहीर केली आहे. जुरासिक कोस्टचा गोल्डन गेटवे म्हणून ओळखला जाणारा खडक मैलांपर्यंत पसरलेलं एक धोकादायक क्षेत्र आहे. ही घटना या खडकांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांची आठवण करून देणारी आहे.