US bomb cyclone: सोसाट्याचा वारा...बर्फाचा मारा...बोचरी थंडी...बर्फाचं भयानक वादळ... अशी परिस्थिती आहे अमेरिकेमधली. अमेरिकेत बर्फाच्या वादळानं (USA Winter Storm) धुमाकूळ घातलाय. बॉम्ब नावाचं हे चक्रीवादळ थांबायचं नाव घेत नाहीये. अमेरिकेतील अनेक राज्यात तापमान उणे 45 अंश सेल्सिअसवर गेल्याने अमेरिकन नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (US bomb cyclone New York under state of emergency millions trapped as temp dips minus 45 degree Celsius marathi news)
चक्रीवादळामुळे न्यूयॉर्कमध्ये (Emergency declared in New York) आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. अनेक शहरातील एअरपोर्ट बंद करण्यात आलेत, 5200 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. आतापर्यंत या वादळामुळे 16 लोकांचा मृत्यू झालाय तर 7 लाख लोकं बेघर झाली. अमेरिकेची ऊर्जा व्यवस्था कोलमडल्याचं दिसतंय. वादळामुळं ट्रान्समिशन लाईन्सचं मोठं नुकसान झालंय.
आणखी वाचा - Video : अमेरिकेत बर्फवृष्टीचा बॉम्ब, ख्रिसमसला ग्रहण!
कॅनडाच्या सीमेजवळील हाव्रे, मोंटाना इथे 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. संपूर्ण अमेरिकेत या वादळाचा रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. वाहतूरक यंत्रणा ठप्प झाल्याने परदेशी जाणाऱ्या नागरिकांची निराशा झाली आहे. अमेरिकेत ख्रिसमसच्या (Christmas) पूर्वसंध्येला मोठं संकट उभं राहिल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचं पहायला मिळतंय.
Shouldn't laugh but..........#ice #blizzard #WinterStorm #BombCyclone #Elliott #wind #snow #Ice #WeatherBomb
video:@kayokayla pic.twitter.com/jJyswxJDkd
— Volcaholic (@CarolynnePries1) December 24, 2022
दरम्यान, अमेरिकेत सध्या वाईट परिस्थिती आहे. रस्ते आणि रेल्वे सेवाही कोलमडल्याची परिस्थिती आहे. अमेरिकेत धुमाकूळ घातलेल्या बॉम्ब चक्रीवादळांमुळं (US bomb cyclone) बर्फाचं वादळं होऊन मुसळधार पाऊस पडत आहे. अमेरिकेतील 20 कोटी लोक म्हणजे, सुमारे 60 टक्के लोक थंडीचा सामना करताना लागतोय. त्यामुळे आता 'बॉम्ब' वर्षाव लवकरच थांबावा, यासाठी सर्वजण प्रार्थना करताना दिसत आहेत.