Trending Video Fire Tornado: सोशल मीडियावर अनेक धक्कादायक, थरारक असे व्हिडीओ आपण कायम पाहत असतो. आम्हाला सांगा तुम्ही कधी आगीचं महाताडवं कधी पाहिला आहे का? एखाद्या घराला, दुकाना किंवा बिल्डिंगला लागलेल्या आगीचे व्हिडीओ (Fire Video) आपण सोशल मीडिया किंवा न्यूज चॅनेलवर पाहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल (Social Media) होतो आहे. ते पाहून तुम्ही नक्की निशब्द व्हाल.
तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, शक्तिशाली आगीच्या महाचक्रीवादळाचं रौद्ररुप दिसतं आहे. धूर आणि आग एकत्र होऊन महाचक्रीवादळाचं हे रौद्ररुप धारण करण्याचा प्रसंग हा खूप क्वचितच पाहायला मिळतो.
जेव्हा जंगलात आगीच्या उष्णतेमुळे हवा वर येते तेव्हा फायर टॉर्नेडो (Fire Tornado) तयार असतात. धूर आणि आग एकत्र येऊन बॉल स्वरुपातील तुफान तयार होतात.
गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेतील कॅलिफोर्नियात जंगलातील आगीचं प्रमाण वाढलं आहे. अशात आग आणि धूर यामुळे आगीचं महाचक्रीवादळाची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांचं म्हणं आहे. (trending video fire tornado in california america video viral on social media in marathi)
Have you ever seen a fire tornado ? Here it is. This is climate emergency pic.twitter.com/5BAO6VXcWF
— Licypriya Kangujam (@LicypriyaK) August 11, 2022
आगीच्या वादळाचं रौद्ररुपचा हा व्हिडीओ Licypriya Kangujam नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा पोस्ट शेअर केल्यानंतर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. Licypriya Kangujam हा एक हवामान तज्ज्ञ असून तो असे अनेक व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतो.