मुंबई : दारुच्या नशेत रस्त्यात किंवा सार्वजनीक ठिकाणी लोकांना हंगामा करताना तुम्ही पाहिलंच असेल. भारता सारख्या ठिकाणी तर हे अगदी सामान्य झालं आहे. आपल्याला आजूबाजूला असे अनेक लोक दिसतात. जे प्यायल्यानंतर गोंधळ घालतात. परंतु एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. जेथे दारु पिऊन एका कपलनं चक्कं उडत्या विमानात गोंधळ घातला आहे. होय, हे खरं हे...
या कपलच्या वागण्यामुळे अखेर पायलटला देखील हे विमान मधेच उतरवावं लागलं. ज्यामुळे प्रवाशांचं देखील नुकसान झालं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घटना ६ जुलैची आहे. इझीजेटचे विमान लिव्हरपूलहून टेनेरिफला जात होते. जॉन लेनन विमानतळ येथून विमानाने उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच फ्लाइटमधील एका जोडप्याने त्यांच्या सीटजवळ उभे राहून दारू पिण्यास सुरुवात केली. यादरम्यान विमानातील कर्मचाऱ्यांनी ड्युटी फ्री दारू आणि सिगारेट न पिण्याची घोषणा केली, पण त्याचा या जोडप्यावर काहीही परिणाम झाला नाही. यानंतर हे जोडपे टॉयलेटमध्ये गेले आणि सिगारेट ओढू लागले.
यादरम्यान अनेक प्रवाशांनी त्यांना असे करण्यापासून रोखले, मात्र ते ऐकायला तयार नव्हते. शेवटी 10 मिनिटांनंतर पायलटने घोषणा केली की, यांच्या अशा वाईट वागणुकीमुळे आम्ही हे फ्लाइट लिस्बनमध्ये उतरवत आहोत.
पायलटचे म्हणणे ऐकून जोडप्याने आणखी गोंधळ सुरू केला. त्यांनी फ्लाइटच्या दारावर लाथ मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर विमान सिस्बन येथे उतरल्यानंतर या जोडप्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यानंतर विमान नियोजित वेळेपासून सुमारे दीड तासांनी आपल्या डेस्टीनेशनवर पोहोचले. यानंतर इतर प्रवाशांनी टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. वास्तविक, या फ्लाईटमध्ये अनेक लोक सुट्टीसाठी जात होते, मात्र या जोडप्याच्या गोंधळामुळे ते त्रस्त झाले होते.
या संपूर्ण घटनेवर विमान कंपनीचे वक्तव्यही आले आहे. कंपनीने याबद्दल खेद व्यक्त करताना सांगितले की, 'अशा घटना दुर्मिळ आहेत, परंतु आम्ही त्यांना गांभीर्याने घेतो. फ्लाइटमध्ये अपमानास्पद किंवा धमकावणारे वर्तन कोणत्याही किंमतीत खपवून घेतले जाणार नाही. प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेला आमच्याकडून नेहमीच प्राधान्य दिले जाते.