Increase Cases of Corona : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात थैमान घातलाय. कोरोनाचे रुग्ण वाढले तर लॉकडाऊन किंवा निर्बंध तर रुग्ण संख्येत घट झाली तर निर्बंधातून सुटका. मात्र चीनमधून पसरलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनची राजधानी बीजिंग येथे कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. (rise in corona cases in beijing, china)
सध्या चीनमध्ये मास टेस्टिंग करण्याचे आदेश दिले आहेत. याच धर्तीवर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थ्यांना घरी राहण्याचे आदेशही शासनाकडून देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना घराबाहेर पडण्यापासून निर्बंध लावण्यात आले आहे. मात्र बीजिंगमधील परिस्थिती शांघाईपेक्षा बिकट नसल्याचे समजते आहे.
बीजिंगमध्ये सोमवारी रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. चीनमध्ये सध्या 802 नवीन रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांना क्वारंटाईन करणं, लॉकडाऊन लावणं आणि चाचण्या वाढवणं यावर प्रशासन भर देताना दिसत आहे. त्यामुळे चीनसमोर पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची वेळ येईल? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
भारतात ओमायक्रॉनच्या नवा व्हेरियंटचा शिरकाव?
दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालणारा ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट भारतात दाखल झाला आहे. आतापर्यंत देशभरात 3 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या BA.4 सब-व्हेरिएंटने भारतात शिरकाव केला आहे. त्या पाठोपाठ आता BA.5 चंही एक प्रकरण समोर आलं आहे.