Tina Datta : टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. त्यानंतर ती कलर्स टीव्हीच्या 'उत्तरन' या मालिकेत दिसली. या मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले. सोश मीडियावर टीना प्रचंड सक्रिय आहे. सध्या ती अविवाहित आहे. रिलेशनशिपमध्ये राहण्याचा तिचा कोणताही इरादा नाहीये.
अलीकडेच टीना दत्ताने तिच्या भविष्यातील नियोजनाबद्दल सांगितले आहे. तिला सिंगल मदर होण्यास कोणताही आक्षेप नाही आणि सध्या ती अशा व्यक्तीचा विचार करत आहे जिच्यासोबत लग्न न करताही ती आई होऊ शकते. मात्र, यावेळी टीनाने असे देखील म्हटले की, तिला लग्नाची घाई नाही. पण भविष्यात मूल दत्तक घेऊन आई होण्याचा विचार करत आहे.
टीना नेमकं काय म्हणाली?
पुढे टीना म्हणाली की, मला विश्वास आहे की मी एक चांगली आई होऊ शकते. पण सध्या तरी मी त्याबद्दल ना विचार केला आहे ना कुठली योजना बनवली आहे. पण जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा सगळ्यांना दिसेल की मी एक चांगली आई असल्याचे सिद्ध होईल. मी कधीच सिंगल मदर होण्याचा विचार केला नाही. पण हा पर्यायही मी माझ्यासाठी खुला ठेवला आहे. मूल दत्तक घेऊन आई होण्याचा पर्याय मी माझ्यासाठी खुला ठेवला असल्याचे तिने सांगितले.
ती सुष्मिता सेनसारख्या अभिनेत्रींची खूप मोठी फॅन आहे. ज्या पद्धतीने त्यांनी दोन मुलींना दत्तक घेतले आहे ते पाहून तिने देखील असाच विचार केला आहे. टीनाला विश्वास आहे की ती तिच्या आयुष्याबाबत कोणताही निर्णय घेईल. तिचे पालक तिला साथ देतील. तिचे आई-वडील कोलकातामधील एका छोट्या शहरातील आहेत. एका छोट्या गावात राहूनही आमची विचारसरणी खूप प्रगतीशील आहे. म्हणूनच भविष्यात जर मी सरोगसीद्वारे आई झाली किंवा मूल दत्तक घेतले तर मला विश्वास आहे की माझे पालक माझ्या दृष्टिकोनाचा आदर करतील आणि मला पाठिंबा देतील.