Iran President Cancelled Interview : 21 व्या शतकातही अनेक रुढी परंपरा लोकांच्या मनात घर करून आहे. सध्या ईराणमध्ये हिजाब आंदोलनाने रौद्र रुप धारण केलं आहे. ईराणमध्ये सुरू असलेलं आंदोलन संपूर्ण जग पाहात आहे. जगासोमर आपल्या देशाची प्रतिमा चांगली ठेवण्याऐवजी इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी (Iran President ebrahim raisi ) हे अजूनही रूढीवादी विचारसरणीला खतपाणी घालताना दिसत आहेत, हे एका घटनेतून समोर आलं. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांनी असं काय केलं, ज्यामुळे त्यांच्याबद्दल चर्चा रंगत आहेत.
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी (Christiane Amanpour) सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी इब्राहिम रायसी यांनी पूर्व नियोजित मुलाखत रद्द केली. कारण त्यांची मुलाखत घेणाऱ्या महिला पत्रकाराने (female news anchor) हिजाब घालून प्रश्न विचारण्याची त्यांची अट मान्य करण्यास नकार दिला. याबाबत महिला न्यूज अँकरने ट्विट करून या घटनेची माहिती दिली. (female news anchor tweet)
काय आहे प्रकरण?
आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी सीएनएनसाठी काम करणाऱ्या न्यूज अँकरचं नाव क्रिस्टियन अमनपोर असं आहे. क्रिस्टियन अमनपोर गुरुवारी अमेरिकेत इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांची मुलाखत घेणार होत्या. मुलाखतीचे आधीच नियोजन करून आठवडाभर तयारी सुरू होती. कॅमेरा, स्टेज सगळं तयार करण्यात आलं होतं. (christiane amanpour net worth)
And so we walked away. The interview didn’t happen. As protests continue in Iran and people are being killed, it would have been an important moment to speak with President Raisi. 7/7 pic.twitter.com/kMFyQY99Zh
— Christiane Amanpour (@amanpour) September 22, 2022
पण मुलाखतीपूर्वी अर्धा तास आधी इराणचे राष्ट्रपती रायसी यांच्या एका सहाय्यकाने अमनपोर यांच्याशी संपर्क साधला आणि ते म्हणाले, "मुहर्रमचा पवित्र महिना असल्याने, तुम्ही हिजाब घालून मुलाखत घ्यावी, अशी राष्ट्रपतींची इच्छा आहे." ही अट मान्य करण्यास अमानपोर यांनी नकार दिला. त्यानंतर इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी मुलाखत रद्द केली.
क्रिस्टियन अमनपोर ट्विट (christiane amanpour young) करत म्हणाल्या, 'राष्ट्रपतींच्या सहाय्यकाच्या अटीवर मी नम्रपणे नकार दिला आणि म्हणालो की आम्ही न्यूयॉर्कमध्ये आहोत, जिथे हिजाबबाबत कोणताही कायदा किंवा परंपरा नाही. याआधी देखील मी अनेक ईराणच्या राष्ट्रपतींची मुलाखत घेतली आहे, पण असं कधीही झालं नाही.' एवढंच नाही तर, अमनपोर यांनी एक फोटो देखील पोस्ट केला आहे. (christiane amanpour education)