अन् जसप्रीत झाली जैनब, भारतीय तरुणीने इस्लाम स्विकारत पाकिस्तानी प्रियकराशी केला निकाह

भारतीय तरुणीने पाकिस्तानी प्रियकराशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्विकारला आहे. पंजाबची जसप्रीत कौर आता जैनब झाली आहे. जैनबने पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये राहणाऱ्या अरसलनाशी निकाह केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 23, 2024, 12:58 PM IST
अन् जसप्रीत झाली जैनब, भारतीय तरुणीने इस्लाम स्विकारत पाकिस्तानी प्रियकराशी केला निकाह title=

भारताच्या पंजाबची राहणारी जसप्रीत कौरने पाकिस्तानी प्रियकराशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्विकारला आहे. जसप्रीत कौरने सियालकोट येथील तरुणाशी निकाह केला आहे. पाकिस्तानी न्यूज वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. वृत्तानुसार, लुधियानाच्या जसप्रीत कौरने निकाह करण्याआधी आपलं नाव बदलून जैनब केलं. जसप्रीत कौरने धर्मपरिवर्तन केल्याचं प्रमाणपत्र जारी करण्यात आलं आहे. 

रिपोर्टनुसार, जसप्रीत आणि अरसलान यांची पाकिस्तानातच 16 जानेवारीला पहिल्यांदा भेट झाली होती. जसप्रीतला पाकिस्तानच्या धार्मिक यात्रेसाठी व्हिसा जारी करण्यात आला आहे. हा व्हिसा 15 एप्रिलपर्यंत वैध आहे. जसप्रीतकडे म्युनिककडून जारी करण्यात आलेला भारतीय पासपोर्ट आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जसप्रीत आणि तिचे आई-वडील भारतीय असले तरी जर्मनीत वास्तव्याला आहेत. 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जसप्रीत कौर त्या दोन हजाराहून अधिक लोकांपैकी आहे ज्यांनी जामिया हनाफियात इस्लाम धर्म स्विकारला आहे. रिपोर्टनुसार, जसप्रीत आणि अरसलान यांची परदेशात एकमेकांशी चांगली ओळख झाली होती. यानंतर अरसलानने जसप्रीतला पाकिस्तानात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. जसप्रीत 16 जानेवारीला धार्मिक यात्रेचा व्हिसा घेत पाकिस्तानात पोहोचली होती. यानंतर तिने इस्लाम धर्म स्विकारला आणि निकाह पार पडला. 

अंजू झाली फातिमा

राजस्थानची राहणारी अंजून जुलै 2023 मध्ये आपल्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेले होती. तिथे तिने धर्मांतर केलं आणि फातिमा झाली. तिने धर्मांतर केल्यानंतर आपला मित्र नसरुल्लाहशी निकाह केला होता. 

अंजू फेसबुकच्या माध्यमातून नसरुल्लाहच्या संपर्कात आली होती. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली होती. यानंतर दोघांमध्ये फोनवरुन संभाषण होऊ लागलं होतं. याचदरम्यान ती नसरुल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तानात पोहोचली होती. 

पाकिस्तानातून भारतात आली सीमा हैदर

याआधी पाकिस्तानच्या कराचीत राहणारी सीमा हैदर संयुक्त अरब अमिराती येथून नेपाळ आणि तेथून भारतात पोहोचली होती. नोएडात राहणाऱ्या सचिनला भेटण्यासाठी सीमा भारतात दाखल झाली होती. सीमा आणि सचिन यांच्यात पब्जीच्या माध्यमातून 2020 मध्ये भेट झाली होती.