Women Minister On Playboy Cover: महिला मंत्री झळकली Playboy मासिकाच्या मुखपृष्ठावर! बोल्ड फोटोमुळे एकच खळबळ

Women Minister On Playboy Magazine Cover: या महिला मंत्र्यानेच कव्हर फोटोचा अर्धा क्रॉप केलेला फोटो शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली असून हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 3, 2023, 02:49 PM IST
Women Minister On Playboy Cover: महिला मंत्री झळकली Playboy मासिकाच्या मुखपृष्ठावर! बोल्ड फोटोमुळे एकच खळबळ title=
Women Minister On Playboy Magazine (File Photo - Reuters)

Women Minister On Playboy Cover: तुम्ही फेमिनिस्ट म्हणजेच स्त्रीवादी असल्याचं सिद्ध करा असं म्हटलं तर तुम्ही काय कराल? महिलांबद्दलचे तुमचे विचार सांगाल, डिजीटल माध्यमांवर स्टेटस ठेवाल किंवा एखादी पोस्ट लिहाल किंवा फार फार तर काही पुस्तकांमधील माहिती सांगाल. मात्र एका महिला मंत्र्याने आपण फेमिनिस्ट म्हणजेच स्त्रीवादी असल्याचं सिद्ध करण्यासाठी चक्क बोल्ड फोटोशूट केलं आहे. विशेष म्हणजे हे फोटोशूट या महिला मंत्र्याने प्लेबॉय (Playboy) या जगप्रसिद्ध मासिकाच्या कव्हर फोटोसाठी केलं आहे. या महिला मंत्र्याने आपला हा बोल्ड फोटोशूटचा निर्णय योग्य असल्याचंही म्हटलं आहे. या महिला  नेत्याचं नाव आहे, मार्लीन शियापा! (Marlene Schiappa)

अनेकदा वादात

मार्लीन या फ्रान्समधील मंत्री आहेत. सन 2017 मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमान्युएल मॅक्रॉन यांनी स्त्रीवादाबद्दल लिहिणाऱ्या 40 वर्षीय लेखिका मार्लीन शियापा यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये संधी दिली. तेव्हापासून मार्लीन या त्यांच्या भूमिकांमुळे सातत्याने चर्चेत आहेत. तशा त्या राजकारणात येण्यापूर्वी त्यांच्या विचारसणीमुळे वादात अडकल्या आहेत. मार्लीन यांच्या भूमिका उजव्या विचारसणीच्या लोकांना आवडत नाही आणि त्यावरुन अनेकदा वाद झाला आहे.

समर्थनही केलं

मात्र आता पंतप्रधान मॅक्रॉन आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्यांनीही मार्लीन यांनी 'प्लेबॉय'साठी केलेलं फोटोशूट हे फारच चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. मार्लीन यांनी कव्हर फोटोसाठी अत्यंत बोल्ड फोटोशूट केलं आहे. तसेच त्यांनी महिला तसेच समलैंगिकांचे अधिकार, गर्भपात यासारख्या विषयांवर भाष्य करणारा तब्बल 12 पानांची मुलाखत दिली आहे. मार्लिन यांनी शनिवारी यासंदर्भात, "महिला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी आपल्या शरीराबरोबर काय करु इच्छितात यासंदर्भातील अधिकारांचं रक्षण करण्यासाठी मी कायम तत्पर आहे... फ्रान्समध्ये महिला स्वतंत्र आहेत... कपटी लोकांना वाईट वाटलं तरी हरकत नाही," असं म्हणत आपला फोटोशूटचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं.

संपादकांनी मांडली भूमिका...

मार्लिन यांचा हा फोटो योग्य असल्याची भूमिका प्लेबॉयचे फ्रान्स भाषेतील अवृत्तीचे संपादक ज्यां-क्रिस्टॉफ फ्लोरैन्टीन यांनी घेतली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये, "फ्रान्स सरकारमधील महिला मंत्र्यांपैकी मार्लीन या फोटो शूटसाठी सर्वात उत्तर निवड होती. कारण,त्या महिला अधिकाऱांशी संबंधित विषयांवर काम करतात. तसेच हे मासिक स्त्रीवादासाठी लढायला चांगलं माध्यम बनू शकतं असा संदेश यामधून जाईल," असं म्हटलं.