जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल, एका रात्रीचं भाडं सर्वसामान्यांच्या वार्षिक पगारापेक्षाही अधिक

Dubai Iconic 10 Star Hotel: जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल. या हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यासाठी द्यावे लागते इतके भाडे 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 17, 2024, 03:48 PM IST
जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल, एका रात्रीचं भाडं सर्वसामान्यांच्या वार्षिक पगारापेक्षाही अधिक title=
Dubai iconic 10 star hotel Burj Al Arab Arabian 10 lakh rs rate per night

Dubai Iconic 10 Star Hotel: कुठेही फिरण्यासाठी जायचं म्हटलं की सगळ्यात जास्त खर्च येतो तो हॉटेलमध्ये राहण्याचा. अलीकडेच एक नवीन ट्रेंड समोर आला आहे. निसर्गरम्य ठिकाणी रिसॉर्ट उभारले जातात. या रिसॉर्टमध्ये पर्यटकांसाठी खास सोयी उभारल्या जातात. जितक्या जास्त सोयी तितकेच याचे पैसेही अधिक घेतले जातात. तसं पाहायला गेलं तर हॉटेलची लोकप्रियता ही स्टार्सवरुन ठरली जाते. फाइव्ह व सेव्हन स्टार हॉटेलचे दरही तितकेच असतात. पण तुम्हाला माहितीये का, जगात एकच 10 स्टार हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्याचे लाखो रुपये द्यावे लागतात. 

दुबई हे जगातील अनेकांचे आकर्षण आहे. जगातील उंचच उंच इमारती आणि वास्तुशिल्प पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी गर्दी करतात. दुबईतच 10 स्टार हॉटेल आहे. बुर्ज अल अरब असं या हॉटेलचे नाव आहे. हे एकमात्र 10 स्टार हॉटेल आहे. एका आर्टिफिशियल आयलँडवर असलेले हे वास्तुशिल्प जुमेराह नजीक बांधण्यात आले आहे. दुबईच्या शानदार स्कायलाइनवर असलेले बुर्ज अल अरब जगातील सर्वात उंच हॉटलपैकी एक आहे. मात्र, या हॉटेलबाबत अनेक रहस्यमय गोष्टी सांगण्यात येतात. या हॉटेलच्या एकूण उंचीपैकी 39 टक्के हिस्सा राहण्यालायक नाहीये. 

1999मध्ये बुर्ज अरब जगातील सर्वाच उंच हॉटेल म्हणून समोर आले. या आलिशान हॉटेलच्या बांधकामासाठी 1 बिलियन डॉलरपेक्षा (8330 कोटी रुपये) जास्त खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे हॉटेल उभारण्यासाठी मानवनिर्मित द्वीप उभारण्यात आला आहे. अनोखा आकार आणि भव्यता लक्ष वेधून घेणारी आहे. बुर्ज अल अरब फक्त एक लग्झरी हॉटेल नसून दुबईतील महत्त्वकांक्षी व आधुनिकतेचे प्रतीक आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, बुर्ज अल अरबमध्ये एका रात्रीसाठी 10 लाख रुपये भाडे आकारण्यात येते. हे हॉटेल मुख्य शहराला एका पुलाच्या माध्यमातून जोडण्यात आले आहे. या हॉटेलच्या छतावर 689 फुटाच्या उंचीचा हेलीपॅडदेखील बनवण्यात आला आहे. या हॉटेलमधून सुंदर असा समुद्र दिसतो. या हॉटेलमध्ये येण्यासाठी ग्राहकांना दोन पर्याय आहेत. एक म्हणजे हेलीकॉप्टरमधून उतरुन थेट हॉटेलमध्ये किंवा मग शाही थाटात रोल्स-रॉयस कारमधून मोठ्या मुख्य दरवाजातून.