सीरिया : हवाई हल्ल्यात बालकांसह ८०० जण ठार

या परिसरात १८ फेब्रुवारीपासून हवाई हल्ले सुरू असून, यात १७७ बालकांसह मृत्यू पावलेलेल्यांची संख्या ८००वर पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 7, 2018, 08:58 AM IST
सीरिया : हवाई हल्ल्यात बालकांसह ८०० जण ठार title=

दोऊमा (सीरिया) : युद्धकलहामुळे विनाशाकडे वाटचाल करत असलेल्या सीरियाची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या पूर्व घोऊतामध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ला झाला. या परिसरात १८ फेब्रुवारीपासून हवाई हल्ले सुरू असून, यात १७७ बालकांसह मृत्यू पावलेलेल्यांची संख्या ८००वर पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

संयुक्त राष्ट्र संघाकडे अपत्कालीन बैठकीची मागणी

दरम्यान, सीरियात वाढत असलेला हिंसाचार आणि रक्तपात पाहून अनेक राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. तर, इग्लंड आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला अपत्कालीन बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. 'सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राईट्स'ने मृत्यू पावलेल्यांची आकडेवारी जारी करताना म्हटले आहे की, रशीयाचा पाठींबा असलेल्या सरकारने दाश्मिकच्या बाहेरच्या परिसरात हल्ले सुरू केले आहेत.

रशियाचेही मोठे नुकसान

दरम्यान, दुसऱ्या बाजूला  रशियालाही मंगळवारी मोठे नुकसान सहन करावे लागले. सुरक्षा मंत्रालयाने म्हटले आहे की, रशीयाचे वाहतूक विमान पश्चिम सीरियाच्या एका विमानतळावर दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानातून प्रवास करत असलेल्या ३२ प्रवाशांचाही या दूर्घटनेत मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अद्यापही संघर्ष सुरू असून, तो कोणत्या टोकाला जाईल हे सांगता येत नसल्याचे अभ्यासंकांनी म्हटले आहे.