रविवारी काही पण होवू शकते; पृथ्वी जवळून बुर्ज खलिफाएवढा मोठा लघुग्रह जाणार

रविवारचा दिवस हा संपूर्ण जगासाठी धोक्याचा ठरु शकतो. हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. नासानं या लघुग्रहांबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

Updated: Jun 10, 2023, 11:07 PM IST
रविवारी काही पण होवू शकते;  पृथ्वी जवळून बुर्ज खलिफाएवढा मोठा लघुग्रह जाणार title=

Asteroid Towards Earth : सगळ्यांची झोप उडवणारी घडामोड अवकाशात घडत आहे. पृथ्वी संकटात आहे. बुर्ज खलिफाएवढा मोठा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. रविवारी म्हणजेच 11 जून रोजी हा लघुग्रह मार्गक्रमण करणार आहे. जर, या लघुग्रहाने  दिशा बदलली  आणि तो पृथ्वीला धडकला तर पृथ्वीवर अनर्थ होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. 

जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाएवढा मोठा लघुग्रह

रविवारी पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या या लघुग्रहाचा आकार जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाएवढा असल्याचा दावा केला जात आहे. हा लघुग्रह पृथ्वीपासून सुमारे 31 लाख किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील हे अंतर आठपट आहे. DART मिशनद्वारे, दोन लघुग्रह प्रणालींपैकी एक लहान लघुग्रह उपग्रहाशी आदळला होता. या लघुग्रहाने आपली दिशा बदलली होती. सूर्यमालेत फिरणारे लघुग्रह हे मुख्यतः मंगळ आणि गुरु या ग्रहांमधून येतात.  या लघुग्रहाचे नाव 1994XD असे आहे. या लघुग्रहाचे आकारमान पाहिले असता हा 1200 ते 2700 फूट इतका रुंद आहे. चंद्रासोबत पृथ्वीच्या बाजूने बाहेर येणार हा  हा एकमेव लघुग्रह असल्याचा देखील दावा केला जात आहे.

लघुग्रह पृथ्वीला धडकला तर मोठा धोका

 नासा तसंच इतर रिसर्च सेंटर्स लघुग्रहांचा धोका ओळखण्यासाठी टेलिस्कोप तसंच न्युयोवाईज सारखे ऑब्जर्वेटर्स वापरतात. कोणताही दगड 460 फुटांपेक्षा जास्त असेल आणि पृथ्वीपासून त्याचे अंतर 74.4 च्या आत असेल. जे धोकादायक ठरू शकते. शास्त्रज्ञांच्या मते, पुढील 1000 वर्षांपर्यंत लघुग्रहांची टक्कर होण्याची शक्यता नाही. पण कोणताही लघुग्रह पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकतो. हा लघुग्रह पृथ्वीला धडकला तर धोका निर्माण होऊ शकतो. 

पृथ्वीवर एक मोठा धोका टळला 

यापूर्वी देखील एक मोठा लघुग्रह  पृथ्वीच्या अगदी जवळून गेला होता. तब्बल ९० हत्तींच्या आकाराएवढा हा मोठा लघुग्रह होता. हा लघुग्रह पृथ्वीला धडकणार असा अंदाज होता. याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये मतंमतांतरं होती. शास्त्रज्ञ रोश यांच्या थिअरीनुसार पृथ्वीच्या त्रिज्येच्या 15 हजार किलोमीटर परिसरात, लघूग्रह, उल्का पिंड आले तर ते पृथ्वीवर कोसळू शकतात  अशी भिती व्यक्त केली होती. या लघुग्रहाचे नाव शास्त्रज्ञांनी 2023 एफएम असं ठेवले होकते. हा लघुग्रह पृथ्वीवर धडकला तर मोठं नुकसान होणार होतं. पण सुदैवानं हा लघुग्रह पृथ्वीच्या 16 लाख किलोमीटर अंतरावरुन निघून गेला.