Afghanistan Crisis : US military च्या विमानातच महिलेची प्रसूती; गोंडस मुलीचा जन्म होताच मिळालं 'हे' नाव

बाळाच्या आईला प्रसूतकळा सुरु झाल्या आणि.... 

Updated: Aug 26, 2021, 03:59 PM IST
Afghanistan Crisis : US military च्या विमानातच महिलेची प्रसूती; गोंडस मुलीचा जन्म होताच मिळालं 'हे' नाव  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) राजकीय अराजकता माजली आणि साऱ्या जगाला यामुळं हादरा बसला. तालिबाननं (Taliban)अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर या देशातून अनेक नागरिकांनी काढता पाय घेत मित्र राष्ट्रांचा आसरा घेतला. सर्वत्र भीती आणि नकारात्मक वातावरण असतानाच एका गोंडस मुलीनं जन्म घेतला आणि जणू एका नव्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी तिच्या कुटुंबाला उद्दिष्ट मिळालं. 

US military च्या विमानातच जन्मलेल्या या मुलीला 'Reach' असं नाव देण्यात आलं. हे नाव अमेरिकेच्या सैन्याच्या मोहिमेमुळंच तिला देण्यात आलं. शनिवारी बाळाच्या आईला प्रसूतकळा सुरु झाल्या. ज्यावेळी विमानानं अमेरिकन सैन्याच्या जर्मनीतील तळाच्या दिशेनं झेप घेतली होती. विमानाचं लँडिंग होताच सैन्यातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी महिलेला विमानाच्या कार्गो भागात बाळाची प्रसूती करण्यास मदत केली. प्रसूतीनंतर महिला आणि बाळाला तातडीनं नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. 

काबूल विमानतळावर आर्थिक लूट, पाणी बॉटल 3000 तर जेवणाची किंमत पाहून शॉक बसेल...

मुलीला कसं मिळालं Reach हे नाव... 
US Air Force च्या प्रत्येक विमानाला दुसऱ्या विमानासी संपर्क साधण्यासाठी काही विशेष नावं दिली जातात. अशातच C-17 cargo विमानाला "Reach" असं नाव देण्यात आलं होतं. दरम्यान, सदर अफगाण कुटुंबाला सुखरुप सुरक्षित स्थळी नेणाऱ्या या विमानाचा कोड होता Reach 828. ज्यामुलं बाळाच्या पालकांनी त्यांच्या नवजात मुलीला रिच असंच नाव देण्याचा निर्णय घेतला. US European Command च्या जनरल टॉड वॉल्टर्स यांनी यासंदर्बातील माहिती दिली, 

मुलीच्या जन्मानंतर तिच्या आणि तिच्या कुटुंबाला इतर अफगाण आश्रितांसह अमेरिकेला नेण्यात आलं. जवळपास 7000 नागरिकांना अफगाणिस्तानातील काबूल येथून अमेरिकेच्या सैन्यदल तळांतून पुढे पाठवण्यात आलं. यांपैकी 100 जणांना वैद्यकिय मदतीची गरज लागली.