'मला मारुन टाका, मी भीक मागतो', आई-वडिलांचं मुंडकं छाटल्यानंतर आरोपीची विनवणी, पोलिसांनी 5 गोळ्या घातल्या अन्...

9 जुलै रोजी, जोसेफ गर्डविलने त्याच्या आईवडिलांची त्यांच्या घरी हत्या केली आणि त्यांच्या मृतदेहांचा ग्राफिक फोटो चुलत भावाला पाठवला.  

शिवराज यादव | Updated: Aug 26, 2024, 03:17 PM IST
'मला मारुन टाका, मी भीक मागतो', आई-वडिलांचं मुंडकं छाटल्यानंतर आरोपीची विनवणी, पोलिसांनी 5 गोळ्या घातल्या अन्... title=

कॅलिफोर्नियात एका आरोपीला पोलीस गोळ्या घालत असताना तो  'आय लव्ह यू' गाणं गात होता. आपल्या आई-वडिलांची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी एकूण 5 गोळ्या घातल्या. जोसेफ ब्रँडन गर्डविल असं आरोपीचं नाव असून त्याने त्याची आई अँटोइनेट (79) आणि वडील  रोनाल्ड (77) यांच्या हत्या केल्या. 

9 जुलै रोजी 41 वर्षीय आरोपीने सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथील मोबाईल होम कम्युनिटीत त्यांच्या घरी आई-वडिलांची हत्या केली. त्यानंतर त्याने त्यांच्या विकृत मृतदेहांचा ग्राफिक फोटो त्याच्या चुलत भावाला पाठवला. यानंतर चुलत भावाने ताबडतोब अधिकाऱ्यांना बोलावलं अशी माहिती ऑरेंज काउंटी शेरीफ विभागाने दिली आहे. 

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना मोबाईल होमच्या आत वृद्ध जोडप्याचे मृतदेह सापडले. एका पीडितेचं डोके काउंटरवर ठेवण्यात आले होते, असं सीबीएस न्यूजने म्हटलं आहे. पोलिसांना गेर्डविल बाईक मार्गावर गोल्फ कार्ट चालवताना आढळला, जिथे त्याने पोलिसांच्या वाहनावर फावडे फेकले. अखेरीस, त्यांनी गर्डविलला एका ठिकाणी अडवलं. बॉडी कॅमेरा फुटेजनुसार तो रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये दिसत होता आणि त्याच्याकडे मेटल वॉटर मीटर होता. पोलीस त्याला वारंवार शस्त्र खाली टाकण्यास सांगत होते, मात्र तो दुर्लक्ष करत होता. गर्डविल पोलिसांकडे कूच करु लागल्यानंतर एका अधिकाऱ्याने त्याच्यावर 5 गोळ्या झाडल्या. 

गोळ्या घालण्यात आल्यानंतर गर्डविल जखमी अवस्थेत खाली पडला होता. पोलीस त्याला बेड्या ठोकण्यासाठी पुढे सरसावले असता त्याने 'आय लव्ह यू' गाणं गाण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने पोलिसांना माझ्या डोक्यात गोळी घालून मला संपवा. मी तुमच्याकडे भीक मागतो अशी विनंती केली. 

गेर्डविलने यानंतर प्रेमगीतं गायला सुरुवात केली, ज्यात टीना टर्नरच्या 1984 च्या हिट 'व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट' आणि स्टीव्ही वंडरच्या 'आय जस्ट कॉल्ड टू आय लव्ह यू,' गाण्यांचा समावेश होता. 

पोलिसांनी जोसेफला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. तो गंभीर जखमी असला तरी प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी त्याच्यावर दोन हत्यांचा गुन्हा दाखल केला आहे. जर दोषी आढळला तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. 

Tags: