मुंबई : मेनोपॉजनंतर महिलांना अनेक बदलांना सामोरं जावं लागतं. यामध्ये मुख्यतः स्तनांमध्येही बदलाव होताना दिसतात. मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीमुळे वेदना, खाज येणं, स्तनांची त्वचा सैल होणं इत्याही बदल दिसून येतात. मुख्य म्हणजे रजोनिवृत्तीनंतर हार्मोन्समध्ये असंतुलन होतं. आणि याचमुळे स्तनांमध्ये बदल झाल्याचं दिसून येतं.
मेनोपॉजदरम्यान शरीरातील एस्ट्रोजन हार्मोनच्या पातळीत घट होते. त्याचप्रमाणे स्तनांमध्ये दूध तयार करणारी कार्यप्रमाणाली संपून स्तनांचे टिश्यू आकुंचित होतात. हेच कारण आहे ज्यामुळे मेनोपॉजमुळे स्तनांच्या आकारात बदल होतो. यावेळी महिलांना त्यांच्या दोन्ही स्तनांमधील आकारात झालेला बदल सहजरित्या लक्षात येऊ शकतो.
स्तनांमध्ये झालेलबा बदल पूर्ववत करता येत नाही. मात्र स्तनांची सैल झालेली त्वचा नीट करण्यासाठी अनेकदा महिलांना डॉक्टर व्यायाम करण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे स्तनांचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
मेनोपॉजदरम्यान स्तनांमध्ये गाठ जाणवणं ही सामान्य गोष्ट आहे. यावेळी स्तनांमध्ये असलेली गाठ धोकादायक नसते. मात्र याचा अर्थ तुम्ही निष्कळजीपणा बाळगून नये. स्तनांमध्ये गाठ जाणवत असल्यास त्याची स्क्रिनिंग करून घ्यावी.
स्तनांमध्ये वेदना जाणवणं ही देखील एक सामान्य गोष्ट आहे. मेनोपॉजदरम्यान काही महिलांना स्तनांमध्ये वेदना जाणवतात. यामागे देखील हार्मोन्समध्ये असंतुलन होणं हे प्रमुख कारण आहे.