मुंबई : साधारणतः मासिक पाळीची सायकल 28 दिवसांची असते. काही वेळा 2-3 दिवस पिरीयड्स येण्यास उशीर झाला तर ते सामान्य मानलं जातं. तर काही महिलांची सायकल ही 31 दिवसांचीही असते. मात्र पिरीयड्स किती जास्तीत जास्त किती दिवस उशीरा येऊ शकतात आणि का. आणि यावरून डॉक्टरांची मदत कधी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पिरीयड्स उशीरा येण्याचं कारण हार्मोन्समध्ये असंतुलन हे असू शकतं. तर दुसरीकडे ज्यावेळी मासिक पाळी सुरु होते तेव्हा आणि मेनोपॉजच्या काळात मासिक पाळी उशीरा येण्याची शक्यता असते.
या कारणांमुळे पिरीयड्स उशीरा येऊ शकतात?
पिरीयड्स उशीरा येण्यामागे तणाव हे मोठं कारण मानलं जातं. कारण ताण असला की तुमच्या हार्मोन्समध्ये बदल होतात, परिणामी मासिक पाळी उशीरा येण्याची शक्यता असते.
जर तुमची उंची तसंच वजन सामान्यपेक्षा 10 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर तुमच्या शरीरात ओव्हुलेशनसंदर्भात समस्या असू शकतात. यामुळे इंटींग डिसॉर्डर देखील होऊ शकतो.
तुमच्या शरीराचं वजन अधिक असणं देखील तुमच्या उशीरा पाळी येण्याचं कारण ठरू शकतं. जर आहारामुळे तुम्हाला पाळी उशीरा येत असेल तर डॉक्टर तुम्हाला आहारात बदल करण्याचा सल्ला देतील.
जर तुम्ही बर्थ कंट्रोल पिल्सचा वापर करत असाल तर एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिन हार्मोन्स अधिक प्रमाणात प्रोड्यूस होतात. ज्यामुळे ओव्हरीज एग रिलीज करणं बंद करते. आणि याचा परिणाम मासिक पाळीवर होतो.