Jio Recharge Plan: मोबाईल यूजर्सच्या हितासाठी ट्राय नेहमी महत्वाचे निर्णय घेत असते. अलीकडेच ट्रायने दूरसंचार कंपन्यांना स्वस्त व्हॉइस ओन्ली प्लॅन लाँच करण्याचे निर्देश दिले होते. यामुळे यूजर्सना कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळू शकणार आहेत. ट्रायच्या नवीन नियमांचा परिणाम दिसू लागला आहे. टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्लान्समध्ये बदल करायला सुरुवात केली असून मोबाईल यूजर्सना याचा फायदा होणार आहे. जिओने त्यांच्या वेबसाइटवर दोन नवीन व्हॉइस ओन्ली प्लॅन सूचीबद्ध केले आहेत.
जिओच्या या व्हॉइस ओन्ली रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना जास्त वॅलिडीटी मिळणार आहे. जे यूजर्स फक्त कॉलिंग आणि एसएमएससाठी मोबाईल वापरतात आणि ज्यांना कोणत्याही डेटाची आवश्यकता नसते अशा यूजर्ससाठी हे प्लान फायदेशीर ठरणार आहेत. याआधी अशा यूजर्सना गरज नसतानाही सोबत डेटा असलेला प्लान विकत घ्यावा लागायचा. पण आता ट्रायच्या नियमांचे पालन करून जिओने दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. जिओचे हे दोन्ही प्लॅन 84 दिवस आणि 365 दिवसांच्या वॅलिडीटीसह येतात. जिओच्या या दोन रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया.
जिओने त्यांच्या 46 कोटी यूजर्ससाठी हा परवडणारा व्हॉइस-ओन्ली प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 84 दिवसांची वैधता मिळते. या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि संपूर्ण भारतात कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी मोफत राष्ट्रीय रोमिंगचा फायदा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 1 हजार फ्री एसएमएसचाही फायदा मिळतो. याव्यतिरिक्त कंपनी आपल्या यूजर्सना जिओ सिनेमा आणि जिओ टीव्ही सारख्या मोफत अॅप्सचा पर्याय देत आहे.
जिओचा या प्रीपेड प्लॅनची वॅलिडीटी 365 दिवसांची आहे. या प्लानमध्ये यूजर्सना भारतात कुठेही कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. एवढंच नव्हे तर यासोबत मोफत राष्ट्रीय रोमिंग आणि 3 हजार 600 मोफत एसएमएस मिळतील. या प्लॅनमध्येही जिओ आपल्या यूजर्सना जिओ सिनेमा आणि जिओ टीव्ही या मोफत अॅप्सचा प्रवेश देते.
कंपनीने हे दोन्ही प्लान व्हॅल्यू प्लॅनमध्ये सूचीबद्ध केले आहेत. तसेच कंपनीने त्यांचे दोन स्वस्त प्लानच्या यादीतून काढून टाकले आहेत. जियो यूजर्सना हे प्लॅन 1899 आणि 479 रुपयांना मिळत होते. 1899 रुपयांच्या प्लॅनमध्ये 336 दिवसांची वॅलिडीटी आणि 24 जीबी डेटा तर 479 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या वॅलिडीटीसह 6 जीबी डेटा मिळत होता.