TRP Report : टी.व्ही. वरील मालिकांच्या परफॉर्मन्सची माहिती दर आठवड्याला टीआरपी रिपोर्टद्वारे समोर येते. यंदा देखील नवीन टीआरपी रेटिंग्स जाहीर झाल्या असून, या आठवड्यातील टॉप मालिकांची यादी समोर आली आहे. जाणून घ्या कोणत्या मालिकांनी आठवडभर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
टीव्ही मालिकांसाठी असलेल्या BARC टीआरपी रिपोर्टमध्ये या आठवड्यात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. पूर्वी टॉप टीआरपी मिळवणारे 'अनुपमा', 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'गुम है किसी के प्यार में' यांसारख्या मालिका आता मागे पडल्या आहेत. त्यांच्या कथानकात काही नवीन किंवा खास दिसुन आले नाही. त्यामुळे या मालिकांना प्रेक्षकांचा हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेने मोठी झेप घेतली आहे. पूर्वी अनेक कलाकार या मालिकेतुन बाहेर पडल्यामुळे यांची लोकप्रियता कमी झाली होती. आता टीआरपीत मागे असलेली ही मलिका यावेळी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. या आठवड्यात 'तारक मेहता का उल्टा चश्म'ने इतर अनेक टी. व्ही कार्यक्रमांना मागे टाकले आहे. यावरून दिसून येते की, या शोच्या पटकथेत झालेला बदल प्रेक्षकांना खूप आवडला आहे.
टीआरपीच्या रेसमध्ये यंदा 'उड़ने की आशा' या मलिकेने बाजी मारली आहे. ती पहिल्या क्रमांकावर पोहोचली असून, 'अनुपमा' दुसऱ्या क्रमांकावर आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. 'अॅडवोकेट अंजलि अवस्थी' या नव्या मालिकेने चौथे स्थान मिळवले आहे, तर 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'गुम है किसी के प्यार में' अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानावर आहेत.
हे ही वाचा: 'वडील सोबत नव्हते, जीवनात पुरुषाची कमी...'; लहानपणीच्या त्रासाबद्दल शाहिद कपूर स्पष्टच बोलला
BARC टीआरपी रेटिंग यादी
1. उड़ने की आशा - 2.5 रेटिंग
2. अनुपमा - 2.4 रेटिंग
3. तारक मेहता का उल्टा चश्मा - 2.3 रेटिंग
4. एडवोकेट अंजलि अवस्थी - 2.2 रेटिंग
5. ये रिश्ता क्या कहलाता है - 2.2 रेटिंग
6. गुम है किसी के प्यार में - 2.2 रेटिंग
7. मंगल लक्ष्मी - 2.1 रेटिंग
8. झनक - 1.8 रेटिंग
9. मन्नत - 1.6 रेटिंग
10. शिव शक्ति तप त्याग तांडव - 1.5 रेटिंग
प्रत्येक आठवड्याला बदलणाऱ्या या यादीत पुढील आठवड्यात कोणती मालिका टॅपला येईल, याची उत्सुकता कायम राहील.