Thane Crime: ठाण्यात एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका 20 वर्षीय नराधमाने 78 वर्षीय महिलेवर बलात्कार केलाय. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय.
पीडित वृद्ध महिलेला विस्मरणाचा आजार आहे. महिला घरात एकटी असल्याचा हेरुन तसेच तिच्या आजारपणाचा फायदा घेऊन या तरुणाने घृणास्पद कृत्य केले. प्रकाश मोरिया असे या गुन्ह्यातील 20 वर्षीय आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी दिंडोशी पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीनंतर 20 वर्षांचा आरोपी प्रकाश मोरियाच्या विरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 64(1) आणि 332(B) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातील सीसीटीव्ही मुळे लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे.दिंडोशी पोलिसांनी आरोपी प्रकाश मोरियाला अटक केली आहे. आरोपी प्रकाश मोरीयाला दिंडोशी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यानंतर न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.