Easy ways to stop menstrual leaking: मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण या दरम्यान महिलांना अस्वस्थ वाटते आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पाच दिवसांच्या या काळात महिलांना केवळ वेदनाच नाही तर कपड्यांवर डाग पडण्याची भीतीही असते, ज्यामुळे त्यांची चिंता वाढते.
एकेकाळी भारतातील बहुतांश महिला फक्त कापडाचा वापर करत होत्या. तो साधारण कापड आरोग्यासाठी सुरक्षित नव्हता. आजच्या काळात मात्र अनेकजणी सॅनिटरी पॅडचा वापर करतात. आता बजारात पॅडशिवाय इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जे अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित मानले जातात. तुम्ही पॅडऐवजी काहीतरी नवीन आणि जास्त सोयीस्कर वापरू शकता. या विषयी सविस्तर जाणून द्या.
मेंस्ट्रुअल कप हा पॅडच्या तुलनेत अधिक रक्त शोषण्याची क्षमता ठेवतो. सिलिकॉनपासून बनवलेला हा कप लवचिक असून, याचा वापर केल्याने रक्ताचे डाग लीक होऊन कपडे घाण होण्यची भीती राहत नाही. पॅडप्रमाणे वारंवार बदलण्याचीही गरज नाही. पण 6 ते 12 तासांमध्ये मेंस्ट्रुअल कप बदलणे आणि चांगल्या प्रकारे स्वच्छ करणे गरजेचे आहे. मेंस्ट्रुअल कप स्वच्छ करताना पाण्याने दोन ते तीन वेळा धुवा आणि हे कप धुताना कोणत्याही सुगंधी साबणाचा वापर करु नका. त्या ऐवजी ph-संतुलित साबणाचा वापर करा. मेंस्ट्रुअल कप व्यवस्थित स्वच्छ करून 6 ते 7 महिने वापरता येतो. याशिवाय, त्याचा डिस्पोजलही सोपा असतो.
पीरियड पॅन्टी ही साध्या पॅंटीसारखीच असते, परंतु ती रक्त सहज शोषून घेते, ज्यामुळे डाग आणि लीक होण्याची समस्या टळते. मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव आणि सोयीप्रमाणे तुम्ही योग्य पीरियड पॅन्टी निवडू शकता. बाजारात विविध आकारांमध्ये या पॅन्टीज उपलब्ध आहेत. पण पॅड किंवा मेंस्ट्रुअल कपच्या तुलनेत पीरियड पॅंटी जरा महाग असू शकते. जर तुम्ही तासन तास घराबाहेर राहता असाल तर त्यासाठी पीरियड पॅंटी एक उत्तम पर्याय आहे.
पॅडच्या जागी तुम्ही टॅम्पोनदेखील वापरू शकता. हा कॉटनपासून बनवलेला असतो आणि आरोग्यासाठी सुरक्षित मानला जातो. पण हे जास्त रक्तस्त्राव होत असेल त्यावेळी वापरणे टाळावे, कारण टॅम्पोन पूर्णपणे रक्त शोषण्यास सक्षम नसतो. टॅम्पोन पॅडची ऍलर्जी असलेल्या महिलांसाठी सर्वाधिक उपयुक्त आहे.
मासिक पाळी दरम्यान आता महिलांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या सोयीसाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)