सॅमसंगने लाँच केले 2 नवे ढासू फोन, नवीन वर्षात विक्रीला सुरूवात

नवीन वर्षात मोबाइलमधील सर्वात अग्रगण्य कंपनी सॅमसंग दोन नवे स्मार्टफोन बाजारात आणत आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 20, 2017, 12:29 PM IST
सॅमसंगने लाँच केले 2 नवे ढासू फोन, नवीन वर्षात विक्रीला सुरूवात

मुंबई  : नवीन वर्षात मोबाइलमधील सर्वात अग्रगण्य कंपनी सॅमसंग दोन नवे स्मार्टफोन बाजारात आणत आहे. 

या दोन नव्या स्मार्टफोनची खासियत अशी आहे की, यामध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरे आहेत. सॅमसंगच्या या नव्या 'A' सिरिजची ग्राहक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. गॅलक्सी A8 आणि गॅलक्सी A8+ अशी दोघांची नावे आहेत. 
कंपनीचा असा दावा आहे की, ए सिरीजमधील स्मार्टफोन हे अतिशय स्टायलिश आणि सुंदर असणार आहेत. गॅलक्सी A8 (2018) आणि गॅलक्सी A8+ (2018) या दोन्ही स्मार्टफोनची विक्री 2018 मध्ये सुरू होणार आहे. 

जाणून घ्या या दोन स्मार्टफोनचे फिचर्स 

डिस्प्ले 

गॅलक्सी A8 (2018) आणि गॅलक्सी A8+ मध्ये 2220* 1080 पिक्सल रिझोल्यूशन असलेला हा 5.6 इंचाचा फूल एचडी सुपर मॉडेल डिस्प्ले आहे. तर गॅलक्सी ए 8 प्लस 2018 मध्ये 1080* 2220 पिक्सझ रिझोल्यूशनचे 6 इंच फूल एचडी सुपर एमलोइड डिस्प्ले आहे. 
इनफिनिटी डिस्प्ले पॅनलच्यावर सुरक्षेसाठी एक कर्व्ड ग्लास देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलक्स A 8 आणि गॅलक्सी A8+ ला देखील कर्व्ड ग्लास देण्यात आली आहे. 

एंड्रायड 

गॅलक्सी A8 (2018) आणि गॅलक्सी A8+ हे दोन्ही स्मार्टफोन 7.1.1 नूगावर रन करतात. हे दोन्ही फोन बाजारा चार कलर वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ब्लॅक, ऑर्किड ग्रे, गोल्ड आणि ब्लू या रंगात मिळतील. 

कॅमेरा 

सॅमसंगच्या दोन्ही नव्या फोनमध्ये दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहे. यामध्ये 16 एमपी फ्रंट आणि 16 एमपी रिअर कॅमेरा दिला आहे. यासोबतच फ्रंट कॅमेरा 8 एमपी सेंसर दिला आहे. दोन्ही सेंसरसोबत युझरला एक ऑप्शन देखील मिळते की युझर्सने बॅकग्राऊंडला ब्लकर करू शकता किंवा फोकस देखील करू शकता. यामुळे तुमचे फोटो नक्कीच चांगले येतील. 

मेमरी 

सॅमसंग गॅलक्सी A8 (2018) आणि गॅलक्सी A8+ मध्ये 32 जीबी आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरिएंट आहे. तसेच या दोन्ही स्मार्टफोनमध्ये मेमरीला मायक्रोएसडी कार्डसोबत 256 जीबी एक्सपांड करू शकता. 

बॅटरी 

गॅलक्सी A8 (2018)मध्ये 3000 एमएएच बॅटरी असून गॅलक्सी A8+ मध्ये 3500 एमएएच बॅटरी आहे. इतर सॅमसंग स्मार्टफोनप्रमाणे याची किंमत अद्याप सांगण्यात आलेले नाहीत. मात्र काही वेबसाइटने यूरोपमध्ये गॅलक्सी A8 (2018)ची विक्रि 499 यूरे म्हणजे भारतीय किंमत 37,750 रुपये असून 
गॅलक्सी A8+ ची किंमत 599 यूरो म्हणजे 45,300 रुपये इतकी आहे.