चॅम्पियन ट्रॉफीमध्ये रविवारी 23 फेब्रुवारी रोजी भारत-पाक सामना झाला. या सामन्यामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये एक पाकिस्तानी चाहत्याने आपला संघ हरतोय असं पाहिल्यानंतर चक्क जर्सीच बदलली आहे. या चाहत्याने नंतर भारतीय संघाची जर्सी घातली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या चाहत्याने मॅचच्या पहिल्या इनिंग दरम्यानच जर्सी बदलल्याचं दिसत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात भारतीय संघाने अगदी सुरुवातीपासूनच आपली पकड धरुन ठेवली होती. टीम इंडियाने पाकिस्तानचे पहिले दोन विकेट 50 धावांच्या आतच घेतला. यानंतर कॅप्टन मोहम्मद रिझवान आणि सऊद शकील यांनी शतकाची भागीदारी करुन संघाला संकटातून तारलं. पण कर्णधार तंबूत परतताच पाकिस्तान संघाने नांग्या टाकल्या.
एकेकाळी 151 धावांत फक्त 2 विकेट गमावल्यानंतर चांगल्या स्थितीत दिसत असलेला पाकिस्तान पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही आणि त्यांना 241 धावांतच सर्वबाद व्हावे लागले. पाकिस्तानच्या एकामागून एक विकेट पडत असताना, एका पाकिस्तानी चाहत्याने खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये आपली जर्सी बदलली.
टीम इंडियाने 242 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पार केले. रोहित शर्मा 20 कदाचित लवकर बाद झाला असेल पण त्यानंतर शुभमन गिल 46, श्रेयस अय्यर 56 आणि विराट कोहली यांनी शानदार खेळी करत भारताला आरामदायी विजय मिळवून दिला.
पाकिस्तानी के फैन को हम लोगों ने भारत जर्सी पहना दिया ! #INDvsPAKlive #INDvsPAK #ViratKohli #virat pic.twitter.com/Mx1w0Ymhy7
— ANSHUL YADAV (@Anshulydv02) February 24, 2025
जेव्हा टीम इंडियाला जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता होती, तेव्हा विराटला त्याचे शतक पूर्ण करण्यासाठी 4 धावांची आवश्यकता होती, अशा परिस्थितीत कोहलीने चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला आणि त्याचे शतकही पूर्ण केले. टीम इंडियाने 45 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला.
या विजयासह, टीम इंडिया ग्रुप-अ च्या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. तर चार संघांच्या या टेबलमध्ये पाकिस्तान शेवटच्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर आणि आता टीम इंडियाविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर, पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमधून जवळजवळ बाहेर पडला आहे. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.