Champions Trophy 2025 Ind vs Pak Rohit Sharma Viral Video: रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सध्या भारतीय क्रिकेटचे दोन आधारस्तंभ आहेत, पण त्या दोघांची खेळाची शैली पूर्णपणे भिन्न आहे. रोहित थेट खेळतो तर विराट संयमाने खेळतो. दुबईत रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात त्यांच्या दृष्टिकोनातील फरक अगदी स्पष्टपणे दिसून आला ज्यात विराटने भारताने घाम न काढता पाकिस्तानचा सहा विकेट्स राखून पराभव केला. या मास्टर खेळाडूने 111 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी खेळली आणि भारताला सहा गडी राखून विजय तर मिळवून दिलाच पण उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावरही आणले. सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये कमी धावसंख्येमुळे विराटचे शतक हुकण्याची भीती होती.
सामन्यादरम्यान एक मनोरंजक क्षण आला जेव्हा भारत विजयाच्या उंबरठ्यावर होता आणि विराट कोहली त्याच्या 51व्या शतकाच्या जवळ होता. संघाला विजयासाठी चार आणि विराट कोहलीला शतक पूर्ण करण्यासाठी फक्त पाच धावांची गरज होती. फिरकीपटू खुशदिल शाहच्या पहिल्याच चेंडूवर विराटने एकेरी धाव घेतली. पण पुढच्याच चेंडूवर अक्षर पटेलने एक धाव घेत विराट कोहलीच्या हाती स्ट्राईक परत दिली. त्यावेळी विजयासाठी फक्त दोन धावा आणि विराटला शतकासाठी चार धावा हव्या होत्या असं समीकरण झालं. याच दरम्यान एक घटना घडली ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विराटच्या शतकासाठी चार धावा उरलेल्या असताना जेव्हा पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या कॅमेरा रोहित शर्माकडे गेला तेव्हा त्याने विराट कोहलीला बघून एक इशारा केला. याच इशाऱ्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. रोहितने विराटला षटकार मारून हा सामना संपवण्याचा इशारा केला. मात्र, विराट कोहलीने शांततेत भारत विजयापासून दोन धावा दूर असताना त्याने चौकार मारला. त्याने यासह केवळ शंभरी मारली नाही तर त्याच्या कारकिर्दीत आणखी एक टप्पा गाठला.
हे ही वाचा: IND vs PAK: हार्दिक पांड्याला मिळाले नवी 'लेडी लव्ह'? बाबर आझमच्या विकेटवर दिली 'ही' खास प्रतिक्रिया
विराट कोहलीने 43व्या षटकातील खुशदिल शाहच्या तिसऱ्या चेंडूवर दमदार चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. याशिवाय त्याने वनडेतील 51वे शतकही पूर्ण केले. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत होता. चौकार मारल्यावर त्याने आनंदात त्याने पॅव्हेलियनकडे हात दाखवला आणि रोहितला म्हणाला.." मी आहे ना, तू रिलॅक्स राहा..."
Bromance of Virat Kohli & Rohit Sharma
Chase master defeated Pakistan & IITianBaba in style#INDvsPAK #ViratKohli
pic.twitter.com/6aravFgupb— Veena Jain (@DrJain21) February 23, 2025
हे ही वाचा: Champions Trophy 2025: टीम इंडियाचे उपांत्य फेरीतील स्थान अजूनही निश्चित नाही, कारण...
यासह शांतपणे विराट कोहलीने सहज त्याचे शतक पूर्ण केले.