WhatsApp मध्ये लवकरच हे नवीन फीचर्स येणार

 व्हॉट्सएपने अॅन्ड्राइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मसवर नवीन फीचर जोडले आहेत. तरी काही दिवसांपासून व्हाट्सऍपच्या वेब सपोर्टमध्ये कोणता नवीन फीचर बघायला मिळालेला नाही.

Updated: Aug 19, 2019, 02:10 PM IST
WhatsApp मध्ये लवकरच हे नवीन फीचर्स येणार title=

मुंबई : पॉप्युलर मेसेजिंग अॅप व्हॉट्सएपमध्ये सतत काही बदल पाहायला मिळतील. कंपनीने अॅन्ड्राइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मसवर नवीन फीचर जोडले आहेत. तरी काही दिवसांपासून व्हाट्सऍपच्या वेब सपोर्टमध्ये कोणता नवीन फीचर बघायला मिळालेला नाही. एका रिपोर्टनुसार आता व्हाट्सऍप वेब प्लॅटफॉमवर नवीन फीचर जोडणार आहे.

WAbetaInfo च्या रिपोर्टनुसार व्हाट्सऐपच्या वेब सपोर्टमध्ये जे नवीन फीचर येतील, त्यात अल्बम आणि ग्रुप स्टीकर्स असतील. अल्बम फीचरमुळे एकत्र पाठवलेले फोटो आणि व्हीडीओ सिंगल बबलमध्ये दिसतील. तर ग्रुप स्टीकर्स तसंच काम करतील, जसे स्मार्ट फोनमध्ये करतात.

दोन्ही नवीन फीचर आतापर्यंत अॅक्टिव्ह झाले नाही. कंपनी काही युझर्ससोबत या फीचर्सला टेस्ट करत आहे. कंपनीचे प्रयत्न आहेत की, फीचर्स रिलीज करण्याआधी त्यात कोणत्या प्रकारची कमी नको. व्हाट्सऍप या फीचर्सला आधिकारीक रित्या कधी जारी करेल, याबद्दल काही माहिती समोर आली नाही.

फिंगरप्रिंट लॉक सपोर्ट
एक दिवस आधीसमोर आलेल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, व्हाट्सऍप अॅन्ड्राइड अॅपमध्ये फिंगरप्रिंट लॉक सपोर्ट देण्यासाठी काम करत आहे. या फीचरला देखील कंपनीने टेस्टिंग पेजवर ठेवले आहे. 

माहितीनुसार फिंगरप्रिंट लॉक एक्टिव्ह झाल्यानंतर देखील युजर्सला आता नोटिफिकेशन पॅनलशी रिप्लाय करण्याचा ऑपशन येत आहे. त्याचे कारण फिंगरप्रिंट सेंसरचे फक्त अॅपमध्ये काम करत असल्याचे म्हटले आहे.

रिपोर्टमध्ये हे देखील सांगितले आहे की, फिंगरप्रिंट सेंसर तीन पर्यायांसोबत काम करेल. हे तीन पर्याय अॅपच्या ऑटोमॅटिक लॉक होण्याशी जोडलेले आहेत. पहिल्या पर्यायात अॅप त्याच क्षणी लॉक होईल. दुसऱ्या पर्यायात अॅपला लॉक होण्यासाठी एक मिनिट लागेल, आणि तिसऱ्या पर्यायात अॅप ३० मिनिटात बंद होईल.