Diwali celebration 2022: आज दिवाळी आणि नरक चतुर्दशी एकाच दिवशी आले आहेत सगळे एकमेकांना शुभेच्छा (diwali wishes) देत आहेत. घराघरात अभयंगस्नान (diwali abhyangsnan) झालं असेल, सर्वानी एकत्र फराळ सुद्धा केला असेल. सगळेजण एकमेकांना शुभेच्छा देतात आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना शुभेच्छा देतात एकमेकांना भेटतात एकत्र वेळ घालवतो. असा हा सणांचा राजा दिवाळी सण सर्वांच्या अतिशय जवळचा आणि आवडीचा सण आहे.
आणखी वाचा: Lakshmipujan diwali 2022: या वस्तूंशिवाय लक्ष्मीपूजन अपूर्ण..आवर्जून वापरा..होईल देवी लक्ष्मीची कृपा
दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण...आजच्या दिवशी घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी घरोघरी नांदो अशी प्रार्थना केली जाते. लक्ष्मी आणि गणरायाची आज पूजा केली जाते (lakshmi ganesh pujan diwali 2022). नवीन कपडे परिधान करुन प्रकाशाचा हा सण साजरा केला जातो. लहान मुलांमध्ये फटाके फोडण्याचा उत्साह दिसून येतो.लहानथोरांमध्ये सणानिमित्त खूप उत्साह पाहायला मिळतो आणि त्यामुळे सर्वजण दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात.
रंगीबेरंगी दिव्यांनी सजलेल्या दिवाळीत आठवणी म्हणून प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करायला कोणाला आवडत नाही . पण एकदम परफेक्ट फोटो काढणं प्रत्येकालाच जमत असं नाही ना मग यासाठी काही विशेष टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या फोल्लो करा आणि या दिवाळीत बेस्ट तो बेस्ट फोटो काढा. (best tips for diwali photo)
दिवाळीचा उत्सव सहसा सूर्यास्तानंतर सुरू होतो. रात्री फोटो क्लिक करताना फ्लॅश लाईट वापरू नये कारण त्यामुळे फोटोचा रंग खराब होतो. त्याऐवजी स्मार्टफोनमध्ये नाईट मोड वापरावा. यामुळे फोटोच्या नॅचरल रंगावर कोणताही परिणाम न होता ब्राईट फोटो क्लिक होतील आणि जर स्मार्टफोन मध्ये HDR सपोर्ट असेल, तर तो नक्कीच ऍक्टिव्ह करा त्यामुळे फोटो आणखी चांगले येतील.
फ्रेम कंपोझ (frame compose)
फोटोग्राफी करताना फ्रेम कंपोझ करण खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला दिव्याचा फोटो घ्यायचा असेल तर कॅमेराचे फोकस दिव्याच्या लिघटवर ठेवा त्याचप्रमाणे, फटाक्यांचे फोटो काढण्यासाठी, आधीपासून फ्रेम सेट करणे चांगले आहे. स्मार्टफोन न हलवता शक्यतो एकाच ठिकाणी ठेवा. यासाठी तुम्ही ट्रायपॉड देखील वापरू शकता.
एक्सपोजर सेट करा (set your exposure)
युजर्स त्यांच्या स्मार्टफोनच्या एक्सपोजरचा वप्पर करून उत्तम फोटो क्लिक करू शकता फायदा घेऊन दिवाळीचे संस्मरणीय फोटो काढू शकतात. ऍपर्चर, ISO आणि शटर स्पीड ही तीन महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत जी फोटोमधील एक्सपोजर सेट करतात.
शटरस्पीड सेट करा (set shutterspeed)
तुमच्या स्मार्टफोनमध्ये अशी तीन उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत, जी एक्सपोजर सेट करण्यात खूप मदतगार ठरू शकतात अपर्चर, आयएसओ आणि शटर स्पीडचा फायदा घेऊन वापरकर्ते हे करू शकतात.
तर अशा प्रकारे या दिवाळीत या सोप्या आणि स्मार्ट टिप्स वापरून तुम्ही उत्तम फोटो क्लिक करू स=उक्त आणि त्यांनतर ते सोशल मीडियावर अपलोड करून बेस्ट लाईक्स आणि कंमेंट्स मिळवू शकता .