...तर कारवाई करतांना मागे हटणार नाही -अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा
पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा कारखाना आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांना आसरा दिला जातो. जगातील अनेक देशांचं यावर एकमत आहे. जर पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांवर वेळीस कारवाई केली नाही तर याचा मोठा परिणाम पाकिस्तानला भोगावा लागणार आहे. अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांचं म्हणणं आहे की, जर भविष्यात अमेरिकेत कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला तर यामुळे अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडतील. त्यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटलं की जर अमेरिकेचत कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर अमेरिका पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यास कोणताही विचार करणार नाही.
Nov 20, 2016, 12:24 PM IST