mrdani 3

'डार्क, डेडली आणि ब्रूटल...' दिग्दर्शक पतीनं केलेली घोषणा पाहून असं का म्हणाली राणी मुखर्जी?

रुपेरी पडद्यावर एक काळ गाजवणारी आणि अनेक तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा डॅशिंग लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निमित्त असेल ते म्हणजे तिचा आगामी चित्रपट. नुकतंच खुद्द आदित्य चोप्रानं यशराज फिल्म्सच्या 'मर्दानी' फ्रॅन्चायझीतील आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे.  'मर्दानी 2' च्या अ‍ॅनिव्हर्सरी निमित्ताने त्याने 'मर्दानी 3' चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी पुन्हा एकदा शूर पोलीस अधिकारी 'शिवानी शिवाजी रॉय'ची भूमिका साकारणार आहे.

Dec 13, 2024, 04:03 PM IST