Sunil Tatkare Exclusive Interview: महाराष्ट्राच्या राजकारणातील शीतयुद्ध आणखी पेटलं आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सुनील तटकरे यांनी शिवसेना नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांच्या सोबतच्या टू द पॉईंट मुलाखतीत सुनील तटकरे यांनी आदिती तटकरे यांचे नाव घेत शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
पालमंत्रीपदाचा वाद सुरु झाल्यापासून महायुती सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतलं शितयुद्ध शिगेला पोहोचल आहे. शिवसेना नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सातत्यानं पातळी सोडून टीका केली जात असल्याचा आरोप सुनील तटकरेंनी केला आहे. टू द पॉईंट मुलाखतीत सुनील तटकरेंनी शिवसेनेकडून आदिती तटकरेंवर केल्या जाणा-या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या टीकेमुळं महायुती सरकारचीच नाचक्की होत असल्याची टीका तटकरेंनी केली आहे. याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडं तक्रारी केल्याचं तटकरेंनी सांगितल आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेनं ठोकलेल्या दाव्यावरुन सुनील तटकरेंनी शिवसेनेवर टीका केलीय. संख्याबळावर पालकमंत्रिपद मागता 2022मध्ये मुख्यमंत्रिपद संख्याबळावर ठरवलं गेलं होतं का असा सवाल तटकरेंनी केला. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असल्यानं पालकमंत्री शिवसेनेलाच मिळावं अशी भूमिका शिवसेनेची आहे. ही भूमिकाच चुकीची असल्याचा दावा राष्ट्रवादीनं केला. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांच्या सोबतच्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. पालकमंत्रिपदाच्या स्पर्धेतून शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील तीन आमदार आदिती तटकरेंवर सातत्यानं टीका करतायत. ही टीका पातळी सोडून असल्याचा आरोप सुनील तटकरेंनी केलाय.