सोन्याच्या किंमती झाल्यात कमी, खरेदीदारांसाठी खुशखबर
सोन्याच्या किंमतीत बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. बुधवारी सोन्याचे दर १६४ रुपयांनी कमी होऊन २४ हजार ८३० रुपयांवर बंद झाले. सकाळी सोन्याचे दर २५ हजार ०६५ होते. दिवसभरात सोन्याने २५ हजार १२७ रुपये इतका उच्चांकी स्तर गाठला तर २४ हजार ८१४ रुपये इतका नीचांकी स्तर गाठला.
Dec 3, 2015, 10:03 AM ISTसोने-चांदीच्या भावात घट, महिन्यातील सर्वात कमी भाव
जागतिक बाजारापेठेत कमकुवत संकेतामुळे आणि दागिने निर्मात्यांनीची मागणी घटल्यामुळे राष्ट्रीय सराफा बाजारात गुरूवारी सोन्याचे भाव २०० रुपयांनी घटून एक महिन्याची खालच्या पातळीला गाठली आहे. सोन्याचे भाव २६,६५० प्रति १० ग्रॅम असा भाव आहे.
Oct 8, 2015, 07:31 PM ISTसोने दरात १८ वर्षांनंतर सर्वात मोठी घसरण, दिवाळीपर्यंत आणखी खाली येणार
तुम्ही जर सोने किंवा सोने नाणी खरेदी करम्याचा विचार करत असाल तर दिवाळीपर्यंत वाट पाहा. दिवाळीपर्यंत सोने प्रति तोळा २५,५०० रुपये इतके खाली येऊ शकते. याचे कारण आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने किंमतीत मोठी घसरण झालेय. १८ वर्षांनंतर ही पाहायला मिळतेय. त्यामुळे स्थानिक बाजारातही सोने दर घसरण्याची शक्यता अधिक आहे.
Oct 3, 2015, 03:27 PM ISTसोने दरात तिसऱ्या दिवशी घसरण
परदेशातील मंदी आणि ग्राहकांची मागणी कमी असल्याने देशाच्या राजधानी सराफा बाजारात सोने दर सलग तिसऱ्या दिवशी घसरलेला पाहायला मिळाला. सोने दरात २३५ रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोने प्रति तोळा २६,५७५ रुपये दर होता.
Sep 29, 2015, 10:15 PM IST... तर २००० रुपयांनी स्वस्त होईल सोनं
पुढील आठवडा सोन्याच्या किमतीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असणार आहे. जगभरातील गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचं लक्ष १६ ते १७ सप्टेंबरला होणाऱ्या अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या (फेड) बैठकीवर असेल. फेड जर व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेईल, तर जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर कमालीचे घसरतील.
Sep 13, 2015, 04:53 PM ISTसोने १९० रुपये स्वस्त, चांदीत ३०० रुपयांची तेजी
वैश्विक बाजारात मंदीमुळे स्थानिक दागिने विक्रेत्यांची मागणी कमी झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्यात लगोपाठ दुसऱ्या दिवशी घट दिसून आली. सोन्याची किंमत १९० रुपयांनी घटून २६ हजार ८१० प्रति ग्रॅम झाली आहे.
Sep 3, 2015, 07:09 PM ISTसोने दरात मोठी घट, गेल्या तीन महिन्यातील निच्चांक
मागणीत झालेली घट आणि जागतिक बाजारपेठेवर असलेली मंदीचे सावट यामुळे सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. दिल्लीत सोने ३३० रुपयांनी खाली आले असून गेल्या तीन महिन्यात सोने दर २६,१७० रुपये प्रती तोळा इतका खाली आलाय.
Jul 8, 2015, 04:42 PM ISTसोन्यानं गाठला तीन महिन्यांमधील निचांक
जागतिक बाजारात असलेली मंदी, दागिने निर्माते आणि रिटेल व्यापाऱ्यांची कमी झालेली मागणी यामुळं या आठवड्यामध्ये दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात चांगलीच घसरण झालीय. तीन महिन्यातील निच्चांक गाठत सोन्यानं २६,५४० प्रति १० ग्राम इतका भाव मिळवला.
Mar 8, 2015, 05:56 PM ISTसोने दरात आणखी घसरण शक्य, 25 हजाराच्या खाली येणार!
सोने खरेदी करण्याऱ्यांसाठी खुशखबर आहे. गेल्या दहा दिवसात सोन्याच्या किंमतीत 10 टक्क्यांनी घट झाली आहे. सोने दराची ही घसरण सुरुच राहण्याचे संकेत आहेत. गतवर्षी 35 हजारांच्यावर पोहोचलेले सोने आता 26 हजारांच्या घरात आहे. सोने दर 25 हजार रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता आहे.
Jun 4, 2014, 09:17 PM ISTअरे वा सोन्याची किंमत अजून घसरली
सोन्याची किंमत दिवसदिवस घसरत असून कालच्या तुलने सुमारे -०.७६ टक्क्यांनी सोन्यामध्ये घट दिसून आली. घाऊक बाजारात सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी २७,२५० तर २२ कॅरेटसाठी २५४७८ प्रति १० ग्रॅम झाली आहे. काल सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी २७,४६० तर २२ कॅरेटसाठी २५६७५ प्रति १० ग्रॅम असे होते.
May 29, 2014, 04:55 PM ISTसोनं, चांदी आणखी घसरलं
सोनं आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आतंरराष्ट्रीय बाजारातील बदलत्या घडामोडींमुळं दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण कायम आहे. स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी सोनं 170 रुपयांनी कमी होत गेल्या 10 महिन्यातील सर्वात कमी म्हणजे 28 हजार 100 रुपये प्रति 10 ग्रामवर आलं.
May 28, 2014, 06:14 PM ISTमंदीनंतर सोने वधारले
सोने दराने पुन्हा 30 हजारी गाठली आहे. सोन्याला पुन्हा तेजी आल्याचे दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईतील ग्राहकांची मागणीमुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Apr 15, 2014, 10:07 AM ISTदिवाळीत सोनं खरेदीचा बेत? खिसा भरलेला ठेवा...
यंदाच्या दिवाळीत सोन्याची वस्तू किंवा दागिने विकत घेण्याचा प्लान करत असाल, तर तुमच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
Oct 28, 2013, 04:07 PM ISTसोने-चांदीच्या दरात तेजीनंतर घसरण
सलग दोन दिवस तेजीत असलेला सोन्याचा भाव मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात ३४० रूपयांच्या घसरनीसह ३१ हजार ६२५ रूपये प्रति तोळा होता. सोन्याबरोबरच चांदीचा भाव ३४० रूपयांनी कमी होऊन तो प्रति किलो ४९ हजार १० हजार रूपयांवर बंद झाला. तर मुंबईत सोमवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. प्रति तोळा २९,७३७ रूपये होता.
Oct 23, 2013, 11:57 AM ISTपहा काय आहेत दर : सोनं-चांदी (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.
Jun 8, 2013, 10:42 AM IST