www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
यंदाच्या दिवाळीत सोन्याची वस्तू किंवा दागिने विकत घेण्याचा प्लान करत असाल, तर तुमच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. कारण, महागाईच्या या दिवसांत यंदाच्या दिवाळीत मागणीच्या तुलनेत सोन्याचा पुरवठा कमी होण्याचा बाजार विश्लेषकांनी अंदाज व्यक्त केलाय.
गेल्य आठवड्यात ३२ हजारांची पातळी सोन्यानं पुन्हा एकदा गाठली होती. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, वाढलेल्या महागाईमुळे ग्राहकांनी गेल्या वर्षभरात सोन्यात केली जाणारी गुंतवणूक काही प्रमाणात कमी केलीय. सोन्याची नाणी आणि बिस्कीटं यांची मागणी गेल्या वर्षभराच्या काळात ५० टक्क्यांनी कमी झालीय. पण, दिवाळीच्या सणात धनत्रयोदशी आणि पाडवा (साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त) या मुहूर्तांवर महागाई कायम असली तरी सोन्याची मागणीही वाढण्याचा अंदाज आहे, त्यामुळेच त्याचे परिणाम तातडीनं सोन्याच्या किंमतीवरही दिसून येतील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दिवाळीच्या विविध मुहूर्तांवर सोनं ३३ हजारांची पातळी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
मुंबईत सध्याचा सोन्याचा भाव ३०,८९८ रुपयांवर स्थिरावलाय. दिल्ली सराफा बाजारातच सध्या प्रतितोळा सोन्याचा भाव ३२,५७० रुपये आहे. गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर दिवाळीच्या विविध मुहूर्तांवर सोन्याची किंमत वाढल्याचंच लक्षात येतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.