काँग्रेस, केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल, देशासाठी हे धोकादायक - मोदी
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आजपासून सुरु झालेल्या भारत विजय रॅलीत अरविंद केजरीवालांवर हल्लाबोल केला. केजरीवाल पाकिस्तानचे एजंट असल्याचा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानला तीन AK मिळाले आहेत, AK -47 , AK एन्टोनी आणि एके -49 म्हणजेच केजरीवाल हे तीन एके असल्याचा टोलाही मोदींनी लगावला.
Mar 26, 2014, 03:35 PM ISTअभिनेत्री नगमासोबत काँग्रेस आमदाराची गैरवर्तणूक
सध्या राजकारणात चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री नगमासोबत छेडछाडी झाल्याची माहिती येतेय.
Mar 23, 2014, 04:18 PM ISTजसवंत सिंहांचं बंड, बारमेरहून अपक्ष निवडणूक लढवणार
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी अखेर राजस्थानमधील बारमेर मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केलाय. ते उद्या सोमवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर जसवंत सिंह यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार असलेले मानवेंद्र सिंह यांनीही पक्षाचं काम करणं अचानकपणे बंद केलंय.
Mar 23, 2014, 01:03 PM ISTआमिर बनला निवडणूक आयोगाचा `नॅशनल आयकॉन`
निवडणूक आयोगानं बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला नॅशनल आयकॉन म्हणून निवडलंय. आमिर भारतीय निवडणूक आयोगाच्या एका जाहिरातीत काम करताना दिसणार आहे.
Mar 20, 2014, 10:28 AM ISTनाराज अडवाणींची समजूत काढण्यासाठी मोदी दिल्लीत!
भोपाळहून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असलेले लालकृष्ण अडवाणी गांधीनगरचं तिकीट मिळाल्यानं नाराज आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज अडवाणींच्या निवासस्थानी पोहोचलेत. अडवाणींच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी मोदींनी पक्ष मुख्यालयातही भेट दिली.
Mar 20, 2014, 09:24 AM ISTजगदंबिका पाल आणि राजू श्रीवास्तव भाजपमध्ये!
काँग्रेस नेते जगदंबिका पाल आणि समाजवादी पक्षाकडून मिळालेले तिकीट नाकारणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय. दोघांनाही भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यताय.
Mar 19, 2014, 04:55 PM ISTलालकृष्ण अडवाणींना गांधीनगरहून मिळणार उमेदवारी
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे अखेर गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातूनच लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. गुजरात भाजपच्या संसदीय मंडळाने गांधीनगरमधून केवळ अडवाणींच्याच नावाची शिफारस केलीय.
Mar 18, 2014, 04:32 PM ISTकेजरीवालांची मीडियाला पहिले धमकी, आता घुमजाव!
आपचं सरकार आल्यास मीडियाला जेलमध्ये टाकणार अशी धमकी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मीडियाला धमकी दिलीय. नागपूरमध्ये काल `डिनर विथ केजरीवाल` कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. १० हजार रुपये घेऊन हा उपक्रम पक्षानं राबवला होता. त्याच कार्यक्रमात केजरीवाल यांनी ही धमकी दिलीय.
Mar 14, 2014, 11:13 AM ISTमहायुतीत बिब्बा घालणाऱ्यांचा भाजपनं बंदोबस्त करावा- उद्धव
`महायुती अभेद्य असून भाजप अन्य कोणत्याही मार्गानं जाणार नसल्याचं नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांनी शिवसेनेला आश्वस्त केलंय. त्यामुळं इतरांनी त्यावर बोलण्याची गरज नाही,` असं सांगत, `महायुतीत बिब्बा घालणाऱ्यांचा बंदोबस्त भाजपनं करावा,` असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठणकावलंय.
Mar 13, 2014, 03:36 PM ISTकमळाबाईंसाठी सेनेचं `टेंगूळ आख्यान`, गडकरींवर टीकास्त्र
सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर टीका केलीय. `टेंगूळ आख्यान` या मथळ्याखाली आलेल्या अग्रलेखात भाजप-मनसे जवळीकीवर टीकास्त्र सोडलंय. दुश्मनांचे डोके फोडण्याऐवजी भाजप सध्या स्वतःच्या डोक्यात काठी मारुन टेंगूळ आणत असल्याची टीका यात करण्यात आलीय.
Mar 13, 2014, 11:43 AM ISTभाजपला मिळाले लालूंचे `राम`!
आरजेडीचे संस्थापक सदस्य आणि लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे रामकृपाल यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
Mar 12, 2014, 04:28 PM ISTदिल्लीतील रॅलीत अण्णांनी मारली दांडी!
दिल्लीतल्या तृणमूल काँग्रेसच्या रॅलीला अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी प्रकृतीचं कारण पुढं करत दांडी मारलीय. रामलीला मैदानावर घेण्यात आलेल्या या रॅलीत हजार लोकही जमलेली नव्हती.
Mar 12, 2014, 02:57 PM IST`नमो नमो`चा जप नको, सरसंघचालकांचे आदेश
भाजपमध्ये सुरु असलेला `नमो नमो`चा जप संघाला मान्य नसल्याची चर्चा सुरु झालीय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केवळ नमो नमोचा जप करु नये, असा स्पष्ट आदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्याचं समजतं.
Mar 11, 2014, 11:27 AM ISTमोदी पंतप्रधान झाले तर आनंदच – अडवाणी
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची स्तुती करत मोदी पंतप्रधान झाल्यास आपल्याला आनंदच होईल असं म्हटलंय. मोदींची स्तुती करुन अडवाणींनी आपली नाराजी दूर झाल्याचंच दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय.
Oct 17, 2013, 07:59 AM IST