rrsairaabreakup : ए आर रहमान आणि सायरा बानो यांच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. असं असताना पहिल्यांदाच ए आर रहमान आणि सायरा बानो यांच्या मुलांनी पालकांच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पालकांच्या घटस्फोटावर मुलांनी भावनिक आवाहन केलं आहे की, आमच्या गोपनियतेची काळजी घ्या मंगळवार 19 नोव्हेंबर रोजी ऑस्कर विनिंग म्युझिक कंपोझर ए आर रहमान आणि पत्नी यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे.
मुलगी रहिमाने इंस्टाग्रामवर पालकांनी घटस्फोट घेतल्याचा निर्णय घेण्यावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, या प्रकरणामध्ये गोपनियतेचा मान राखल्यामुळे सगळ्यांच कौतुक. या सगळ्यासाठी मनापासून आभार.
दुसऱ्या मुलीने खतीजाने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलं आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, आम्ही सगळ्यांना विनंती करतोय की, आमच्या खासगी आयुष्याचा सन्मान ठेवा. हे समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. तसेच मुलगा अमीनने देखील लोकांना आवाहन केलं आहे.
एआर रहमानची पत्नी सायरा बानो यांनी लग्नाच्या इतक्या वर्षानंतर अचानक विभक्त होण्याचा निर्णय घेतलेला नाही, तर बराच वेळ विचार करून त्यांनी हा गंभीर निर्णय घेतला आहे. तिने हे पाऊल का उचलले याचा खुलासा तिच्या वकिलाने प्रसिद्धीपत्रकात केला आहे. प्रेस रिलीझमध्ये असे लिहिले आहे की, “लग्नाच्या अनेक वर्षानंतर श्रीमती सायरा यांनी पती एआर रहमानपासून वेगळे होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. त्यांच्या नात्यात बराच भावनिक ताण आल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. एकमेकांवर त्यांचे नितांत प्रेम असूनही, या जोडप्याला असे दिसून आले आहे की, तणाव आणि अडचणींमुळे त्यांच्यात एक अंतर निर्माण झाले आहे, जे यावेळी कोणत्याही पक्षाला कमी करता आले नाही. वेदना आणि त्रासामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे सायराने आवर्जून सांगितले. सायरा या आव्हानात्मक काळात लोकांकडून गोपनीयतेची आणि समजून घेण्याची विनंती करते, कारण ती तिच्या आयुष्यातील या कठीण काळातून जात आहे.”
सायरा बानोच्या वक्तव्यानंतर एआर रहमानने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक भावनिक नोट देखील शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, “आम्हाला वाटले होते की, आमच्या लग्नाला 30 वर्षे पूर्ण होतील, पण परिस्थिती पाहता तसे होईल असे वाटत नाही. आमची ह्रदये इतकी तुटलेली आहेत, की या तुटलेल्या हृदयांच्या भाराखाली देवाचे सिंहासनही थरथर कापू शकते, तुटलेल्या मनाने हे सांगणे खूप त्रासदायक आहे. तुटलेले भाग पुन्हा त्यांची जागा शोधत नाहीत. तथापि, आपण तुटलेल्या गोष्टींमध्येही काही अर्थ शोधला पाहिजे. या कठीण काळात आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल आमच्या सर्व मित्रांचे आभार.”