www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
निवडणूक आयोगानं बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला नॅशनल आयकॉन म्हणून निवडलंय. आमिर भारतीय निवडणूक आयोगाच्या एका जाहिरातीत काम करताना दिसणार आहे. या जाहिरातीत आमिर मतदारांना आपल्या मतदानाच्या अधिकाराचा सक्षम वापर करण्याची अपिल करताना दिसणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग आमिरसोबतच क्रिकेटर विराट कोहली यालाही नॅशनल आयकॉन म्हणून निवडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोघेही नागरिकांना मतदान करण्याविषयी बजावणार आहेत.
यामुळे, नॅशनल आयकॉन लीगमध्ये क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी, बॉक्सर मेरी कोम, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत आमीर आणि विराटचाही समावेश होईल. त्यामुळे, पहिल्यांदाच मतदारांचा उत्साह वाढविण्यासाठी एकत्रित सहा लोकांना नॅशनल आयकॉन बनविण्याची ही पहिलीच वेळ असेल.
आगामी लोकसभा निवडणुकीत दोन करोड नवे मतदार मतदानाचा हक्क निभावणार आहेत. त्यामुळे, नव्या मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करण्याचं आव्हान या आयकॉन्सला पेलावं लागणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.