नवीन पटनायक – १६ मेनंतर किंगमेकर?
नवीन पटनायक हे दिवंगत बिजू पटनायक याचे पूत्र आहेत. ते ओडिशाचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. नवीन पटनायक हे आपल्या वडिलांच्या निधनानंतर राजकारणात आले. त्यानंतर त्यांनी स्वतःला देशातील शक्तीशाली नेता म्हणून सिद्ध केले.
Apr 4, 2014, 03:59 PM ISTजयललिता - तामिळनाडूला पहिल्यांदा पीएमपदाची संधी?
आपल्या जीवनात कठीण परिस्थितीचा संघर्ष करून, सतत पुढे जात रहाणं, हा ध्यास जर कुणी ठेवला असेल, तर ते नाव आहे जयललिता.
Apr 4, 2014, 03:18 PM ISTममता बॅनर्जीः पंतप्रधानांच्या शर्यतीत आघाडीवर
राजकारणाच्या पटलावर ममता बॅनर्जी यांचे वेगळेच स्थान आहे. खूप मेहनतीनंतर त्यांनी आपले राजकीय स्थान मिळवले आहे. ममता या बिनधास्त आहेत, त्या कोणत्यावेळी कोणाची साथ देतील आणि सोडून देतील हे कोणी सांगू शकत नाही. एकेकाळी त्या यूपीए सरकारमध्ये सहभागी होत्या. पण आपल्या अटींवर सरकारने काम केले नाही म्हणून त्या सरकारमधून बाहेर पडल्या.
Apr 4, 2014, 03:04 PM ISTमायावती - `बहेनजी`नाही व्हायचंय पंतप्रधान?
लोकसभा निवडणूक २०१४मध्ये बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची भूमिका खूप महत्त्वाची असेल. सध्या मायावती राहुल गांधी, नरेंद्र मोदी, मुलायम सिंह यादव आणि अरविंद केजरीवाल या आपल्या विरोधकांपेक्षा कमी दिसतायेत आणि त्या प्रचार रॅलीही कमी करतायेत. मात्र निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाची रणणिती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तयार केलीय.
Apr 4, 2014, 02:19 PM ISTमुलायम सिंह यादव: किंग किंवा किंगमेकर?
मुलायम सिंह यादव यांचं उत्तर प्रदेश आणि देशातील राजकारणात मोठं नाव आहे आणि त्यांचा राजकारणातील अनुभवही तगडा आहे. राज्यातील राजकारणात सर्व काही मिळवल्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मुलगा अखिलेश यादव यांच्यावर सोपवली आणि आता ते स्वत:ला देशाच्या राजकारणात झोकून दिलंय. आता त्यांची नजर आहे ती आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकीवर...
Apr 4, 2014, 01:33 PM ISTनितीश कुमारः दिल्लीचे ‘स्वप्न’
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जन्म 1 मार्च 1951 रोजी पाटणाच्या बख्तियारपूरमध्ये झाला. नितीश कुमार यांच्या वडिलांचं नाव श्री कविराज राम लखन सिंह आणि आईच नाव श्रीमती परमेश्वरी देवी आहे.
Apr 4, 2014, 12:45 PM ISTअरविंद केजरीवालः राजकारणातील ‘आम आदमी’
इंजिनिअर ते नोकरशाह आणि नोकरशाह ते सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ता ते राजकारणी बनलेले अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीला दिल्लीत सत्तेत आणून राजकीय विचारधारा बदलली.
Apr 4, 2014, 12:27 PM ISTशरद पवार : घड्याळाच्या काट्याची दिशा कोणाकडे?
लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असली तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका अजूनही अस्पष्ट दिसून येत आहे.
Apr 4, 2014, 12:12 PM ISTराहुल गांधीः ‘युवराजा’ची वाट बिकट
विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलीटी म्हणजे महान शक्तींसोबत महान जबाबदारी येते. पण दुदैवाची गोष्ट म्हणजे हा प्रकार काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधीच्या बाबतीत लागू होत नाही..
Apr 4, 2014, 11:50 AM ISTनरेंद्र मोदी – ७ रेसकोर्स रोडसाठी रेस
२०१४ च्या लोकसभा निवडणुका या चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषविणारे आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याभोवतीच फिरताना दिसत आहे.
Apr 4, 2014, 11:39 AM ISTबाळासाहेबांचं कार्य पुढं चालू ठेवा, मोदींचं आवाहन
अमरावतीमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडली. आनंदराव अडसूळांच्या प्रचारासाठी मोदी आज अमरावतीमध्ये दाखल झाले होते. यावेळी शेतकरी आत्महत्यांवरून मोदींनी राज्यसरकार आणि शरद पवारांना चांगलच धारेवर धरलं.
Mar 30, 2014, 01:36 PM ISTजसवंत सिंहांचं भाजपमधून ६ वर्षांसाठी निलंबन
जसवंत सिंह यांना भाजपमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. राजस्थानमधल्या बारमेरमधून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या जसवंत सिंहांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरलाय.
Mar 30, 2014, 10:19 AM ISTनरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे करीन - इम्रान मसूद
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे केले जातील, असे धक्कादायक विधान काँग्रेसचे लोकसभा उमेदवार इम्रान मसूद यांनी केले आहे. त्यामुळे या विधानाने काँग्रेस आणि भाजपमध्ये नव्याने वाद उफाळणार आहे. मेसूद यांची भाषा घसरल्याने रायकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
Mar 28, 2014, 12:37 PM ISTनरेंद्र मोदींच्या रॅलीमध्ये सौम्य लाठीचार्ज
बिहार पोलिसांनी आज गया इथं जमावाला नियंत्रित करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची गया इथं सभा होती. मोदींचं भाषण सुरू होण्यापूर्वी हा गोंधळ गांधी मैदानावर सुरू झाला.
Mar 27, 2014, 05:30 PM ISTवक्तव्याबद्दल खेद, विषय इथंच संपवा - शरद पवार
दोनदा मतदान करा, या वादग्रस्त विधानाप्रकरणी शरद पवारांनी निवडणूक आयोगाला उत्तर दिलंय. माझ्या वक्तव्याबद्दल झालेल्या गोंधळामुळे मी खेद व्यक्त करतोय. तसंच हा विषय इथेच संपवावा, अशी विनंती शरद पवारांनी केलीय.
Mar 26, 2014, 07:22 PM IST