मोदींच्या सभेसाठी वाराणसीत मैदान नाही, परवानगी नाकारली
देशात आज आठव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. १२ तारखेला मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडेल. तेव्हा नरेंद्र मोदींच्या वाराणसी इथंही मतदान होणार आहे. त्या अगोदर उद्या नरेंद्र मोदी वाराणसीत सभा घेणार आहेत. मात्र ही सभा आता परवानगीच्या कचाट्यात सापडली आहे.
May 7, 2014, 02:59 PM ISTप्रियंका गांधींची सेक्रेटरी अमेठीतील मतदानकेंद्रात!
अमेठीतील घमासान शिगेला पोहोचलंय. प्रियंका गांधींची पीए प्रिती सहाय ही अमेठीतील एका मतदान केंद्रावर होती. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी त्याला आक्षेप घेतला आणि प्रिती सहायला बाहेर काढलं.
May 7, 2014, 02:18 PM ISTमोदी-प्रियांकामध्ये शाब्दिक खडाजंगी
निवडणुकांचा निकाल येण्याची वेळ जसजशी जवळ येतेय. तसतशी टीकेची पातळी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गांधी कुटुंब विरुद्ध नरेंद्र मोदी हा सामना सुरू आहे. गांधी आणि मोदींच्या आरोप-प्रत्यारोपांनी आता `नीच` पातळी गाठली आहे.
May 6, 2014, 12:50 PM ISTअमेठीची जनता मोदींना माफ करणार नाही- प्रियांका
आठव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच नरेंद्र मोदींनी गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्यात अमेठीत नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यावेळी नरेंद्र मोदींनी दिवंगत राजीव गांधींवरही टीका केली. या टीकेला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी एक पत्रक जारी केलंय.
May 5, 2014, 10:37 PM ISTनरेंद्र मोदींना अटक करा, तृणमूल काँग्रेसची मागणी
आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या अटकेची मागणी तृणमूल काँग्रेस पक्षानं केली आहे. जातीच्या नावावर मतं मागितल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेस पक्षानं मोदींविरोधात अटकेची मागणी करणारं पत्र निवडणूक आयोगाला पाठविलंय.
May 5, 2014, 10:20 PM ISTमोदींविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेत कमळ हातात घेतले खरे, पण हेच कमळ त्यांना अडचणीचे ठरले आहे. कमळ हातात घेऊन हातवारे करत माहिती देण्याचा प्रयत्न केला. हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार काँग्रेसने केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचे आदेश दिले.
Apr 30, 2014, 02:33 PM ISTचिरंजीवीनं रांग तोडली, तरुणानं केला विरोध
केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस खासदार अभिनेता चिरंजीवी यांची आज हैदराबादमध्ये मतदानावेळी एका तरूणानं चांगलीच जिरवत त्याला आपली जागा दाखवली.
Apr 30, 2014, 01:18 PM IST`कमळ` झळकावल्यानं मोदींविरोधात काँग्रेसची तक्रार
कालपर्यंत सूटवर लावलेलं कमळ आज मोदींनी हातात घेतलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोदींनी कमळ हातात घेऊन पत्रकार परिषद घेतली. मोदीचं हेच कमळ हातात घेणं काँग्रेसला आक्षेपार्ह वाटलंय. काँग्रेसनं मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. मोदींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसनं केलीय.
Apr 30, 2014, 12:01 PM ISTबहुमताचा २५ वर्ष जुना रेकॉर्ड तोडणार - मोदी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे आपलं मतदान केलं. मोदींनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा मतदारसंघ गांधीनगरसाठी मतदान केलं. गुजरातच्या सर्व २६ लोकसभा जागांवर आज मतदान आहे आणि मोदी स्वत: बडोद्यावरून निवडणूक लढवतायेत.
Apr 30, 2014, 10:42 AM ISTरामदेवबाबांच्या कार्यक्रमांना लखनऊमध्ये बंदी
योगगुरू रामदेवबाबांना त्यांनी केलेलं वादग्रस्त विधान चांगलंच भोवलंय. आपल्या वक्तव्यावर माफी मागितल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई झालीय.
Apr 27, 2014, 02:45 PM ISTनमोंचा उमेदवारी अर्ज, वाराणसीत रोडशो, जनसागर रस्त्यावर
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेसाठी वाराणसीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Apr 24, 2014, 12:44 PM ISTमोदींची पत्नी रामदेवबाबांच्या आश्रमात?
`द वीक` या इंग्रजी साप्ताहिकानं केलेल्या दाव्यानुसार, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्नीला रामदेवबाबांच्या आश्रमात पोहचवलंय.
Apr 24, 2014, 11:49 AM ISTमुस्लिमांनी जातीयवादी व्हावं, शाझिया इल्मींचं वादग्रस्त वक्तव्य
मुस्लिम नागरिकांनी धर्मनिरपेक्षपणा थांबवून मतदान करावं आणि या निवडणुकीत जातीयवादी व्हावं, असं वादग्रस्त वक्तव्य गाझियाबाद इथल्या आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार शाझिया इल्मी यांनी केलं आहे.
Apr 23, 2014, 05:41 PM ISTगिरीराज सिंहांना वादग्रस्त विधान भोवलं, प्रचारावर बंदी
वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप नेते गिरीराज सिंग यांच्यावर निवडणूक आयोगानं निर्बंध लादलेत. त्यांना बिहार आणि झारखंडमध्ये प्रचारास बंदी घालण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. तसंच त्यांना स्वतंत्र कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीये.
Apr 22, 2014, 10:34 PM ISTभगवान बुद्धानंही सोडलं होतं पत्नीला, मोदींची भावाकडून पाठराखण
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी सोमवारी मोदींच्या विवाहाबाबत त्यांची पाठराखण केलीय. ते म्हणाले, भगवान बुद्धानंही आपल्या पत्नीला सोडलं होतं, तेव्हा त्यांना कोणी नाही विचारलं की त्यांना का बरं हे पाऊल उचललं?.
Apr 22, 2014, 09:31 PM IST