bank

SBI, ICICI सह या बॅंकांच्या कार्डने रेल्वे तिकीट बुकिंग करणं अशक्य

आयआरसीटीसीने एसबीआय, आयआसीआयसीआय समवेत काही प्रमुख बॅंकांच्या डेबिट कार्डने तिकीट बुकिंगची सोय ब्लॉक केली आहे.

Sep 22, 2017, 04:09 PM IST

SBI खातेदारांचे ATM कार्ड करणार ब्लॉक

 भारतीय स्टेट बँक ग्राहकांना तगडा झटका देण्याच्या तयारी आहे. असे होऊ शकते की तुमचे एटीएम किंवा डेबिट कार्ड ब्लॉक होऊ शकते.  

Aug 22, 2017, 03:20 PM IST

बॅंक कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकारला विरोध; २२ ऑगस्टपासून जाणार संपावर

यूनियम फोरम ऑफ बॅंक यूनियन्स (यूएफबीयू) ने २२ ऑगस्टपासून देशव्यापी संप पूकारणार असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने बॅंकींग क्षेत्रात आणलेल्या नव्या बदलांना विरोध करण्यासाठी हा बंद पूकारण्यात येणार आहे.

Aug 17, 2017, 10:46 PM IST

एचडीएफसी बॅंकेने बचत खात्यातील व्याजदरात केले हे बदल !

एचडीएफसी बॅंकेने बचत खात्यावर मिळणार्‍या व्याज दरात ०.५० टक्के  कपात केली आहे.

Aug 17, 2017, 07:16 PM IST

नोटबंदीमुळे व्याजदर घटले, कर्जं स्वस्त झाली: नरेद्र मोदी

७१व्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीत लाल किल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा देशाला झालेला फायदा सांगितला. मोदी म्हणाले नोटबंदीमुळे बॅंकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला. ज्यामुळे कर्जांवरील व्याजदर घटले आणि कर्जे स्वस्त झाली.

Aug 15, 2017, 07:10 PM IST

सोमवारी बॅंक व्यवहार सुरुच राहणार

सध्या सोशल मीडियावर बॅंका पुढील चार दिवस बंद राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, उद्या दुसरी शनिवार आणि रविवारी बॅंकाना सुटीच आहे. मात्र, सोमवारी बॅंका नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. केवळ १५ आणि १७ ऑगस्टला सुटी आहे. त्यामुळे चार दिवस बॅंका बंद असल्याची केवळ चर्चाच आहे.

Aug 11, 2017, 10:07 AM IST

बँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही - कोर्ट

 एका दाम्पत्याला बँकेने ई-मेल आयडी बंधनकारक असल्याचे सांगितले. जर तुमचा ई-मेल आयडी नसेल तर  व्याजावरील टीडीएस कपात करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला होता. याप्रकरणी या दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी निकाल देताना बँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिलाय.

Aug 10, 2017, 09:28 AM IST

लवकरच बॅंकांमध्येही पाच दिवसांचा आठवडा होण्याची शक्यता !

 लवकरच बॅंकेच्या कर्मचार्‍यांनाही प्रत्येक शनिवार- रविवार सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.

Aug 8, 2017, 11:53 AM IST

काळा पैसावाल्यांची झोप उडणार, स्विस बँक भारताला माहिती देणार

स्विस बँकेत आपला काळा पैसा ठेवून निवांत बसलेल्या सगळ्याचींच झोप उडवणारी बातमी समोर आली आहे.

Aug 6, 2017, 11:13 PM IST

...असा एखादा बँकेचा 'फेकू' कॉल तुम्हालाही आलाय का?

फोनवरून तुमच्या एटीएम आणि क्रेडिट कार्डाची माहिती घेऊन, लाखो रूपयांचा गंडा घालण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढलेत. अशा भामट्यांना पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतायत.

Aug 4, 2017, 10:27 PM IST

'रेरा'अंतर्गत नोंदणी झालेल्या गृहप्रकल्पांनाच कर्ज, बॅंकांचा निर्णय

राज्यात 'रेरा' कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर आता बँकांनीही या कायद्यासाठी अधिक कडक होण्याचा निर्णय घेतलाय. 

Aug 4, 2017, 12:51 PM IST

पीक विमा शेतकऱ्यांसाठी ठरतोय मनस्ताप, शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगा

पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता 48 तासांहून कमी कालावधी शिल्लक आहे. पीक विमा अर्ज ऑनलाईन भरायचा असून त्यासाठी 31 जुलै ही शेवटची मुदत आहे. त्यातच पीकविमा भरता यावा यासाठी रविवारीही बँका सुरु आहेत. 

Jul 30, 2017, 01:16 PM IST

शेतकरी पीक विमा : ऑफलाईन अर्ज स्वीकारणार, रविवारी बॅंका सुरु

शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता उद्या रविवारीही राज्यातील बँका सुरू राहणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Jul 29, 2017, 11:08 PM IST