Rohit Sharma Fan: बॉलिवूडच्या कलाकारांचे जसे चाहते असतात तसेच क्रिकेटर्सचेही अनेक चाहते आहेत. या चाहत्यांसाठी त्यांच्या खेळाडूंना भेटणं फार मोठी गोष्ट असते. असाच रक प्रसंग नुकताच घडला. रोहित शर्माचा एक उत्साही चाहता मनुका ओव्हलमध्ये आला होता. तेव्हा रोहितच लक्ष वेधण्यासाठी अनेक वेळा त्याचे नाव पुकारले. त्यावर रिस्पॉन्स न मिळाल्याने त्याने 'मुंबई चा राजा' असे ओरडले. यानंतर रोहितने त्या फॅनची 10 वर्षांपासून असलेली ईच्छा पूर्ण केली. त्याचा ऑटोग्राफ घेतला. रविवारी, पंतप्रधान इलेव्हन विरुद्धच्या सराव सामन्यात भारताच्या सहज विजयानंतर हसतमुख रोहितने त्याची दशकभराची प्रतीक्षा संपवली.
रोहित स्टॅन्डचा इथे आला. त्याने तिथे उपस्थित असलेल्या फॅन्सला हसतमुख ऑटोग्राफ द्यायला सुरुवात केली. यावेळी त्याच्या एका चाहत्याने स्टँडवरून विनवणी केली, " रोहित रोहित, रोहित भाई प्लीज, मुंबईचा राजा, १० वर्षे झाली यार...." असे म्हणत त्याने रोहितला त्याचा ऑटोग्राफ हवा असल्याची ईच्छा व्यक्त केली. रोहीतनेही हसत मुखाने आपला ऑटोग्राफ दिला आणि त्याची 10 वर्षांपासून वाट पाहत असलेली ईच्छा पूर्ण केली. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
हे ही वाचा: ऑक्शनमध्ये unsold पण तरीही 'हे' खेळाडू IPL 2025 मध्ये खेळू शकतात, कसे? जाणून घ्या
रोहित शर्माचा ऑटोग्राफ घेण्यासाठी एका चाहत्याने 10 वर्षे वाट पाहिली आणि काल त्याचा भाग्यवान दिवस होता. बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित चाहत्यांशी संवाद साधताना आणि बॅट आणि जर्सीवर ऑटोग्राफ देताना दिसत आहे. तोपर्यंत या चाहत्याने स्टेडियममध्ये उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
The wait of a decade finally ends. A fan waited for 10 years to get a @ImRo45 autograph and yesterday was his lucky day #TeamIndia pic.twitter.com/miywxlE8gA
— BCCI (@BCCI) December 2, 2024
सराव सामन्यात भारताने पीएम इलेव्हनचा 6 विकेटने पराभव केला. खराब हवामानामुळे सामना प्रत्येक संघासाठी 46 षटकांचा करण्यात आला. रोहितने सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि केवळ तीन धावा करून तो बाद झाला. दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीतून बाहेर पडलेला रोहित शर्मा शुक्रवारपासून ॲडलेडमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.पर्थ येथे झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान संघाचा 295 धावांनी पराभव करून भारत मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. रोहितच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने संघाचे नेतृत्व केले.