माझा नाही, हा दिल्लीकरांचा विजय - अरविंद केजरीवाल
आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा तब्बल २२ हजार ६८२ मतांनी पराभव केला. त्यानंतर केजरीवाल यांनी हा माझा नाही तर दिल्लीकरांचा विजय असल्याची प्रतिक्रिय़ा दिलीय.
Dec 8, 2013, 05:26 PM ISTअरविंद केजरीवाल यांची झाडू आणि आपची जादू
दिल्लीतलं काँग्रेसचं जहाज कुणी बुडवलं असेल तर ते `आम आदमी पार्टी`नं... आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला नसला तरी राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित सरकारचा सुपडा साफ करण्यात आपची `झाडू`च कारणीभूत ठरली. आम आदमीच्या या घवघवीत यशाचा सूत्रधार होता एक आयआयटीचा मॅकेनिकल इंजिनिअर, अरविंद केजरीवाल.
Dec 8, 2013, 02:10 PM ISTविधानसभा निवडणूक : देशाच्या राजधानीत मतदान सुरू...
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरुवात झालीय.
Dec 4, 2013, 09:40 AM ISTमाझ्या नावाचा गैरवापर नको, अण्णांनी सुनावलं
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही जोरदार दणका दिलाय.
Nov 19, 2013, 11:04 AM ISTमराठी मुलानं केजरीवालांच्या अंगावर फेकली काळी शाई!
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत आज एकच गोंधळ उडाला. एका तरूणानं आज केजरीवालांची पत्रकार परिषद सुरू असताना, त्यांच्या अंगावर काळी शाई उडवली.
Nov 18, 2013, 08:45 PM ISTकेजरीवाल- शीला दीक्षितांमध्ये ‘सीएम डिबेट’?
‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना औपचारिकरित्या सार्वजनिक चर्चेचं आमंत्रण दिलंय.
Oct 24, 2013, 03:59 PM IST‘NOTA’ मिळाला, `व्हेटो` नाही!
निवडणुकीच्या सर्व उमेदवारांना नाकारण्याचा अधिकार मतदारांना असल्याचं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे व्होटिंग मशिनवर ‘नन ऑफ द अबव्ह’ हे बटण येणार आहे. असं असलं तरी ज्या उमेदवारांना मतं मिळाली आहेत, त्यांतून जास्त मतं मिळवलेला उमेदवारच विजयी ठरणार आहे.
Sep 27, 2013, 03:57 PM IST‘आम आदमी पार्टी’ बनली करोडपती!
अण्णा हजारेंशी फारकत घेऊन राजकारणाच्या माध्यमातून आपली वेगळी वाट निवडणाऱ्या ‘आम आदमी पार्टी’ला मिळणारा लोकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र दिसतंय.
May 29, 2013, 01:25 PM ISTकेजरीवालांनी मोडला अण्णांचा रेकॉर्ड; उपोषण सोडणार
वीज आणि पाण्याच्या वाढत्या बिलांविरुद्ध आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसलेत.
Apr 6, 2013, 08:27 AM ISTउपोषण सोडण्यासाठी केजरीवालांना अण्णांची गळ!
शुक्रवारी रात्री उशीरा अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यावेळी अण्णांनी अरविंद केजरीवाल यांना उपोषण सोडण्यासाठी गळ घातलीय. अरविंद केजरीवाल हे २३ मार्चपासून उपोषणाला बसले आहेत.
Mar 30, 2013, 10:01 AM ISTमोदी नाही, केजरीवालांना अमेरिकेचं आमंत्रण!
‘आम आदमी पार्टी’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अमेरिकेतल्या व्हार्टन इंडिया इकॉनॉमिक कॉन्फरन्समध्ये आमंत्रित करण्यात आलंय.
Mar 5, 2013, 09:25 AM IST‘अण्णांवर एक नाही तर हजारो आयुष्य ओवाळून टाकेन’
‘अण्णांवर एक नाही तर हजारो आयुष्य ओवाळून टाकेन’ असं म्हणत अरविंद केजरीवाल स्वामी अग्निवेश यांच्या आरोपांचं खंडन केलंय.
Feb 20, 2013, 12:21 PM IST'उपोषणादरम्यान अण्णांचा मृत्यू, हीच केजरीवालांची इच्छा'
टीम अण्णातील माजी सदस्य स्वामी अग्निवेश यांनी केलेल्या एका वक्तव्यानं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिलीय. एका न्यूज चॅनलशी बोलताना, उपोषणादरम्यान अण्णा हजारेंचा मृत्यू व्हावा, जेणेकरून त्याचा फायदा आंदोलनाला मिळू शकेल... अशीच अरविंद केजरीवाल यांची इच्छा होती, असं विधान स्वामी अग्निवेश यांनी केलंय.
Feb 19, 2013, 12:50 PM ISTकेजरीवालांनी उघड केले अंबानी बंधूंचे अकाउंट नंबर्स
अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी या पक्षाच्या स्थापनेपूर्वीच अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत खळबळ माजवली होती. यावेळी मुख्यत्वे केजरीवालांचा रोख होता तो अंबानी बंधूंवरच. मात्र आता त्यांनी अंबानी बंधूंचे बँक अकाउंट नंबरही जनतेसमोर उघडे केले आहेत.
Dec 10, 2012, 05:58 PM ISTकेजरीवाल लालची, AAPला कधीच मत देणार नाही- अण्णा
अरविंद केजरीवाल यांनाही अखेर सत्तेचा मोह सुटला नाही. त्यामुळेच त्यांनी ‘आम आदमी पार्टी’ स्थापन केली आहे. त्यामुळेच मी कधीही ‘आम आदमी पार्टी’ला मतदान करणार नाही असं अण्णा हजारे म्हणाले आहेत.
Dec 6, 2012, 08:12 PM IST