केजरीवाल...बिना हत्याराचा माओवादी - भाजप
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्द भाजपनं जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यसभेत विरोधी पक्ष भाजपचे नेते अरुण जेटली यांनी तर `अरविंद केजरीवाल हे बिना हत्याराचे माओवादी` असल्याचं म्हटलंय.
Jan 22, 2014, 10:27 AM IST'आप'चा ड्रामा संपला : दोन दिवसानंतर धरणे आंदोलन मागे
दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. रेलभवनजवळ मोठ्या प्रमाणात पोलिस आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू आहे.
Jan 21, 2014, 04:07 PM IST`वैतागलेल्या केजरीवालांना हवंय राजीनाम्यासाठी निमित्त`
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकूट डोक्यावर चढवलेले अरविंद केजरीवाल सध्या वैतागलेत... राजीनामा देण्यासाठी ते केवळ निमित्त शोधत आहेत, असं म्हणत किरण बेदी यांनी केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवलाय.
Jan 21, 2014, 01:28 PM ISTदिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांचे आंदोलन सुरुच
दिल्लीत ४ पोलिसांचे निलंबन किंवा बदली तरी करावी म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांचे धरणे आंदोलन आज दुस-या दिवशीही सुरु आहे.
Jan 21, 2014, 12:02 PM ISTजेव्हा मुख्यमंत्री आंदोलन करतात... तेव्हा नागरिकांचे हाल होतात...
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन सुरू केलंय.
Jan 20, 2014, 12:14 PM ISTभटकळच्या सुटकेसाठी अरविंद केजरीवालांच्या अपहरणाचा कट
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धोका असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय. केजरीवाल यांचं अपहरण होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. पोलिसांच्या अटकेत असलेला दहशतवादी यासिन भटकळच्या सुटकेसाठी हा अपहरणाचा कट रचला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय.
Jan 20, 2014, 08:21 AM ISTकेजरीवाल यांचा ‘जनता दरबार’ बरखास्त
नागरिकांमध्ये रिअल ‘नायक’ म्हणून स्वतःला सिद्ध करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जनता दरबार बंद केला आहे. शनिवारी जनता दरबार भरवून प्रत्यक्ष लोकांच्या तक्रारी जाणून घेण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी घेतला होता. पण गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने जनता दरबार स्थगित करावा लागला होता.
Jan 13, 2014, 06:03 PM ISTमेधा पाटकर `आप`ला पूर्ण पाठिंबा, प्रवेश नाही सहकार्य
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण आम आदमी पक्षाला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यांनी पक्ष प्रवेश केला नसला तरी संपूर्ण प्रक्रियेत ‘आप’ला पाठिंबा असल्याचं त्या म्हणाल्या. शिवाय आम आदमी पक्षासोबत आणखी चर्चा सुरू असून १६ आणि १७ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत अधिक चर्चा होऊन निर्णय सांगणार असल्याचंही मेधा पाटकर म्हणाल्या.
Jan 13, 2014, 03:04 PM ISTअरविंद केजरीवालांच्या जीवाला धोका, माफिया मागावर
आपल्या ‘झाडू’नं भ्रष्टाचाराला साफ करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती आयबी अर्थात गुप्तचर विभागानं दिलीय. त्यामुळं आता केजरीवालांच्या भोवती सुरक्षा वाढविण्याची तयारी सुरू आहे.
Jan 13, 2014, 11:50 AM ISTमेधा पाटकरांचा आज ‘आप’ प्रवेश?
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आम आदमी पार्टीत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
Jan 13, 2014, 08:17 AM IST`केजरीवाल` सरकारकडून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या स्टिंग ऑपरेशनसाठी `कॉमन मॅन`ला धडे
भष्ट्राचाराने हैराण असलेल्या सर्वसामान्यांना आम आदमीने कडक पावलं उचलली आहेत. आम आदमी पार्टी लवकरच एक चार अंकी नंबर जारी करणार आहे.
Jan 9, 2014, 10:52 AM ISTकेजरीवालांचे सरकारी स्टींग ऑपरेशन, हेल्पलाईन नंबर जारी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी भ्रष्टाचार संपविण्यासाठी विडा उचलला आहे. यासाठी आधी जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक सकाळी ते रात्री यावर संपर्क साधून आपली तक्रार करू शकणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांचे हे सरकारी स्टींग ऑपरेशन असेल, असे म्हटले जात आहे.
Jan 8, 2014, 06:45 PM ISTअरविंद केजरीवाल यांनी १० खोल्यांचे घर नाकारले
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १० खोल्यांचे घर घेण्याचे नाकारले आहे. आपण छोट्या घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रशासनाला तसे कळविले आहे, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.
Jan 4, 2014, 11:39 AM IST‘आप’ हमे अच्छे लगने लगे! कॉर्पोरेट विश्व वळलं ‘आप’कडे!
आम आदमी पार्टीनं केवळ दिल्लीकरांवरच जादू केलेली नाही... तर कॉर्पोरेट विश्वातील `बिग बॉस` मंडळींसोबतच सामान्य नागरिकांवरही अरविंद केजरीवालांच्या या नव्या राजकीय पक्षानं गारूड केलंय... गेल्या ८ डिसेंबरला दिल्लीचा निकाल लागल्यापासून, जवळपास ४ लाखांहून अधिक लोकांनी `आप`चं सदस्यत्व स्वीकारलंय...
Jan 2, 2014, 10:24 PM ISTअरविंद केजरीवालांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव
अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलंय. एकूण ३७ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव ‘आप’ सरकारनं जिंकला. विधानसभेत याबाबत मतदान पार पडलं.
Jan 2, 2014, 06:59 PM IST