'जंतरमंतर'वर सरकारविरोधात अण्णांचा एल्गार
नुकतंच पद ग्रहण करणारे भारताचे १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह १५ भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा सदस्य आजपासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसली आहे. स्वत: उपोषण करित नसले तरी अण्णाही यावेळी जंतरमंतरवर सदस्यांसोबत उपस्थित राहिले आहेत.
Jul 26, 2012, 11:03 AM ISTअण्णांच्या सहकाऱ्यांचं स्टिंग ऑपरेशन; पैसा येतो कुठून?
एका बाजुला टीम अण्णांच्या जंतर मंतरवर होत असलेल्या आंदोलनामुळं देशातलं वातावरण ढवळून निघण्याची चिन्ह असतानाच दुसऱ्या बाजुला ‘द वीक’ या इंग्रजी साप्ताहिकानं केलेल्या एका स्टींग ऑपरेशनमुळं खळबळ उडालीय. अण्णांच्या आंदोलनाला येणारा पैसा हा नेमका कुठल्या मार्गाने येतो, याची माहिती अण्णांच्या सहकाऱ्यांनी स्टींग ऑपरेशनमध्ये केल्याचा दावा ‘द वीक’ने केलाय.
Jul 25, 2012, 07:57 AM ISTअण्णांचं सरकारला ४ दिवसांचा अल्टिमेटम
15 भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा उद्यापासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसणार आहे. यानिमित्तानं अण्णा हाजरेही दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी सरकाराला चार दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. तोपर्यंत मागणी पूर्ण झाली नाहीत, तर अण्णाही उपोषणाला बसणार आहेत.
Jul 24, 2012, 07:00 PM ISTराष्ट्रपती प्रणवदा भ्रष्टाचारी - टीम अण्णा
देशाचे नवनियुक्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी भ्रष्टाचारी असल्याचा आरोप टीम अण्णांनी केला आहे. मुखर्जी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असून २५ जुलैला ते सर्वासमक्ष जाहीर करणार असल्याचं टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
Jul 23, 2012, 09:15 AM ISTकेजरीवाल यांच्याविरोधात नाही - किरण बेदी
टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात किरण बेदींनी अण्णांना लिहलेल्या पत्राबाबत किरण बेदींनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. आपण असं कोणतही पत्र अण्णांना लिहलं नसल्याचं बेदींनी म्हंटलं आहे.
May 26, 2012, 05:45 PM IST'फेसबूक'वरून 'टीम अण्णा'मध्ये वितुष्ट
भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारणा-या टीम अण्णांमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट निर्माण झाल्याचं समोर आलंय. टीम अण्णा सदस्य शिवेंद्र सिंह चौहान यांनी अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केलाय.
May 25, 2012, 02:16 PM ISTशरद यादवांच्या संदर्भात केजरीवालांचे वादग्रस्त विधान
टीम अण्णांच्या अरविंद केजरीवाल यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन वादंगाला तोंड फोडलं आहे. शरद यादव यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा वाद भडकण्याची शक्यता आहे.
Mar 25, 2012, 04:19 PM ISTटीम अण्णांचे केजरीवाल अडचणीत
देशाच्या संसदेत खूनी, दरोडेखोर आणि बलात्कारी बसले आहेत, असे वक्तव्य करणारे टीम अण्णांमधील सदस्य अरविंद केजरीवाल चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्याबाबत त्यांना नोटीस धाडण्यात आली आहे.
Mar 17, 2012, 06:54 PM ISTकेजरीवाल यांनी का केलं नाही मतदान?
भ्रष्टाचार मुद्दावर आंदोलन करणारे आणि त्यासाठी देशात मतदारांमध्ये जनजागृती करणारे 'टीम अण्णां'मधील सदस्य अरविंद केजरीवाल यांनी मतदान केलंच नाही. ज्यावेळी केजरीवाल मतदान करायला मतदान केंद्रावर गेल्याने त्यांचं मतदार यादीत नाव नसल्याचे पुढे आले. त्यामुळे पुन्हा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.
Feb 28, 2012, 01:22 PM ISTसंसद सदस्य दरोडेखोर आहेत- अरविंद केजरीवाल
टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी संसद सदस्य चोर, दरोडेखोर आणि बलात्कारी असल्याचं विधान केल्यानंतर मोठ्या वादंगाला तोंड फूटलं आहे. देशातल्या जकीय नेत्यांनी केजरीवाल यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
Feb 27, 2012, 12:29 AM ISTराळेगणसिध्दीत आज आंदोलनाची दिशा
टीम अण्णामधील सदस्य अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटणार आहेत. यावेळी पुढील आंदोलनाची काय दिशा असावी याबाबत राळेगणसिध्दीत चर्चा होणार असल्याची माहिती टीम अण्णामधील दत्ता तिवारी यांनी दिली.
Jan 10, 2012, 10:41 AM ISTछोड आये हम वो गलीयाँ...
सरकारने टीम अण्णांचे प्रमुख सदस्य अरविंद केजरीवाल यांनी इंडियन रेव्हन्यू सर्व्हिस सोडल्यानंतर अखेरीस सहा वर्षांनी राजीनामा मंजुर केला आहे. केजरीवाल यांनी त्यासाठी नऊ लाख रुपयांचा भरणा केल्यानंतर ४५ दिवसांनी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.
Dec 22, 2011, 07:41 PM ISTटीम अण्णांनी नाकारलं सरकारचे लोकपाल विधेयक
टीम अण्णांनी सरकारने संसदेत मांडलेल्या लोकपाल विधेयकावर घणाघाती हल्ला चढवला आहे. सरकारने मांडलेले विधेयक जनतेच्या विरोधात असल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले. सरकारच्या हातातलं बाहुलं लोकपाल बनेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
Dec 22, 2011, 10:57 AM ISTकिरण बेंदींविरुद्ध तक्रार खोटी- केजरीवाल
किरण बेंदीवरील आरोप टीम अण्णांनी फेटाळले. टीम अण्णांची प्रतिमा मलीन केली जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवालांनी केला. किरण बेंदींना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप. किरण बेंदींच्या बचावासाठी टीम अण्णा बचावासाठी मैदानात उतरली आहे.
Nov 28, 2011, 11:49 AM ISTकेजरीवाल यांना काळे झेंडे
अरविंद केजरीवाल यांच्या कार्यक्रमात घंटानाद संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्य़ाचा प्रयत्न केलाय. यावेळी केजरीवाल यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले.
Nov 6, 2011, 10:17 AM IST