‘आप’च्या काँग्रेस-भाजपसमोर १८ अटी
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आम आदमी पार्टीला बिनशर्त पाठिंबा देण्याचं जाहीर केल्यानंतर दिल्लीच्या सत्तेच्या पेच सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्याचवेळी अरविंद केजरीवाल यांनी मात्र पाठिंबा घेण्यासाठी या दोन्ही पक्षांसमोर १८ अटी ठेवल्या आहेत.
Dec 14, 2013, 07:11 PM ISTकेजरीवाल यांना हवेत १० दिवस, सत्तेसाठी जनतेशी संवाद
दिल्लीत आम आदमीचे सरकार येणार की नाही माहित नाही. मात्र, आपने उपराज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली. आम्हाला दहा दिवसांची मुदत द्या, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यामुळे केजरीवाल काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
Dec 14, 2013, 11:47 AM ISTकेजरीवाल यांनी काँग्रेसला `आप` केले, सत्तेचा गोंधळ सुरू
नवी दिल्लीतील निवडणुकीनंतरचा गोंधळ सुरूच आहे. त्यामुळे दिल्लीच्या सत्तेचा तिढा सुटणार की नाही, असेच दिसून येत आहे. काँग्रेसने आधी जाहीर केल्याप्रमाणे आपल्या पाठिंब्याचे पत्र नायब राज्यपालांना दिले होते. परंतु आम्हाला बहुमत नसल्याने सत्ता स्थापन करणार नाही असे सांगणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसने देऊ केलेला बिनशर्थ पाठिंबा धुडकावला आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
Dec 14, 2013, 09:01 AM IST‘काँग्रेस’चा हात ‘आम आदमी पक्षा’ला साथ!
दिल्लीत काँग्रेसनं आम आदमी पार्टीला पाठिंबा दिलाय. दिल्लीच्या नायब राज्यपालांना याबाबतचं पत्र काँग्रेसनं आज रात्री सादर केलं.
Dec 13, 2013, 10:02 PM ISTदिल्लीत सरकार बनविण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करणार ‘आप’
देशाची राजधानी दिल्लीत सरकार बनविण्यासंदर्भातल्या आपल्या भूमिकेबाबत आता आम आदमी पक्ष थोडा नरमलेला दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार आता ‘आप’ दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहे. पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांच्या घरी ‘आप’ची बैठक सुरु आहे. ज्यात पहिल्यांदाच दिल्लीत सरकार स्थापन करण्याच्या पर्यायांबाबत आपण विचार करत असल्याचं सांगण्यात येतंय.
Dec 13, 2013, 03:56 PM ISTअण्णा हजारे यांची भेट टळली, केजरीवाल आजारी
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा राळेगणसिद्धी दौरा रद्द झाला आहे. आजारी असल्याचे कारण देत केजरीवाल यांनी राळेगणसिद्धीला जाणं टाळलं आहे. दरम्यान, कुमार विश्वास आणि गोपाल राय आपल्या नियोजित कार्यक्रमाप्रमाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी राळेगणला जाणार आहेत.
Dec 12, 2013, 09:17 AM ISTकेजरीवाल सत्तेची जबाबादारी घेण्यापासून पळतायेत - पवार
दिल्लीत आम आदमी पार्टीला यश मिळाले असले तरी त्यांना सत्तेची जबाबदारी नको आहे. अरविंद केजरीवाल आता सत्तेची जबाबादारी घेण्यापासून का पळतायत? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केजरीवालांची टर उडवलीय.
Dec 12, 2013, 07:57 AM IST`झी मीडिया`च्या दणक्यानंतर केजरीवाल यांना सुचली उपरती
दिल्लीत मिळालेल्या यशानं आपण हुरळून गेलो नाहीत, लवकरच म्हणजे उद्याच आपण अण्णांची भेट घेणार आहोत, असं यानंतर केजरीवाल यांनी जाहीर केलंय.
Dec 11, 2013, 07:38 PM ISTअण्णांच्या उपोषणाला आशेचा एकच ‘किरण’!
अण्णांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. अण्णा हजारे यांच्यासोबत किरण बेदीही येत्या शनिवारपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसणार आहेत.
Dec 11, 2013, 06:23 PM ISTअरविंद केजरीवालांचं, गरज सरो... वैद्य मरो!
जनलोकपालसाठी अण्णा हजारे यांनी `करो या मरो`चा निर्धार करत, बेमुदत उपोषण सुरू केलंय... तर दुसरीकडं आम आदमी पार्टीचा आणि पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांचा अजूनही विजयाचा जल्लोष सुरू आहे.
Dec 11, 2013, 06:07 PM ISTआपापल्या पक्षात घुसमटणाऱ्यांना `आप`चा रस्ता मोकळा - केजरीवाल
दिल्लीत सरकार स्थापनेवरून अजूनही गोंधळचाच वातावरण कायम आहे. याच दरम्यान, आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्या एका वक्तव्यानं हे वातावरण आणखीन गरम केलंय.
Dec 10, 2013, 04:52 PM ISTपेच दिल्लीच्या गादीचा: प्रशांत भूषण यांनी वक्तव्य फिरवलं
जनलोकपालच्या मुद्द्यावर भाजपने पाठींबा दिला तर दिल्लीत सरकार स्थापनेसाठी आम आदमी पार्टी भाजपला पाठींबा देईल, या प्रशांत भूषण यांच्या विधानावर खळबळ माजली होती. मात्र या प्रशांत भूषण यांनी आज हे विधान फेटाळलंय.
Dec 10, 2013, 12:50 PM IST‘आप’ भाजपला काही अटींसह समर्थन देण्यास तयार- प्रशांत भूषण
दिल्लीत सत्ता कोण स्थापन करणार याला जणू ग्रहणच लागलंय. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीय, सरकार बनवण्यासाठी ३६ सीट्स गरजेच्या आहेत. अजूनही भाजप आणि आम आदमी पक्षानं आतापर्यंत सरकार बनविण्यासंदर्भात पुढं आले नाहीत.
Dec 10, 2013, 10:30 AM IST`जेडीयू`ची `आप`ला समर्थनाची तयारी, केजरीवाल मुख्यमंत्री बनणार?
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा पेच वाढत चाललाय. याच दरम्यान नीतीशकुमार यांच्या पक्षानं म्हणजेच जेडीयूनं ‘आम आदमी पार्टी’ला समर्थन देण्याची तयारी दाखवलीय.
Dec 9, 2013, 04:19 PM IST.. मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर!
दिल्लीतलं काँग्रेसचं जहाज कुणी बुडवलं असेल तर ते `आम आदमी पार्टी`नं... आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला नसला तरी राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित सरकारचा सुपडा साफ करण्यात आपचा `झाडू`च कारणीभूत ठरला... आम आदमीच्या या घवघवीत यशाचा सूत्रधार होता एक आयआयटीचा मॅकेनिकल इंजिनिअर... अरविंद केजरीवाल...
Dec 8, 2013, 10:40 PM IST