राष्ट्रवादी

भाजपला टोला, कोल्हापुरात पाव्हणं, नाद करायचा नाय!

महानगरपालिकेत भाजपने सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली केल्यात. प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरात भाजपचीच सत्ता येणार असे छातीठोक सांगत होते. मात्र, काँग्रेसने त्यांच्या उत्साहावर पाणी ओतले. दरम्यान, निकाल लागल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'मै हू डॉन' आणि 'नाद करायचा नाय, पाव्हणं, नाद करायचा नाय' अशा गाण्यांवर डॉल्बीचा ठेका धरत, अनोखे उत्तर दिले.

Nov 3, 2015, 07:41 PM IST

कोल्हापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता, महापौर काँग्रेसचा

भाजपने कोल्हापुरात आपले बस्तान मांडण्यासाठी ताराराणी या स्थानिक पक्षाशी आघाडी केली. मात्र, त्यांना त्यात मोठे अपयश आले. तर काँग्रेसने आपले बस्तान चांगलेच बसविले. त्यामुळे पालिकेत त्यांच्या पक्षाचा महापौर बसणार आहे. काँग्रेसने 'हात' पुढे करत राष्ट्रवादीला सोबत घेत त्यांच्या पारड्यात उपमहापौरसह महत्वाचे स्थायी समिती सभापतीपद देण्याचे मान्य केलेय.

Nov 3, 2015, 03:55 PM IST

पालिका निवडणुका : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजी, भाजपाला धक्का

कल्याण - डोंबिवली महानगरपालिका निवडणुकींबरोबरच राज्यातील ५८ नगरपरिषदा निवडणुकीचे निकाल आज लागले. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने सर्वाधिक १० नगरपरिषदा जिंकल्या असल्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २१ नगरपरिषदा जिंकून सत्ताधारी भाजपाला धक्का दिला आहे. 

Nov 2, 2015, 07:22 PM IST

राजेश लाटकर यांचा पराभव, राष्ट्रवादीला धक्का

कोल्हापुरात राजेश लाटकर यांच्या निमित्तानं राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसलाय. भाजपच्या आशिष ढवळे यांनी लाटकर यांना धूळ चारलीय. 

Nov 2, 2015, 03:17 PM IST

राष्ट्रवादीच्या बेपत्ता नगरसेविकेची आत्महत्या

बेपत्ता नगरसेविका शशिकला मालादी यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, हा घातपात असल्याचा संशय मालादी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Oct 2, 2015, 04:58 PM IST

भ्रष्टाचाराला वाचा फोडल्याबद्दल महापौरांचं अभिनंदन - राष्ट्रवादी

भ्रष्टाचाराला वाचा फोडल्याबद्दल महापौरांचं अभिनंदन - राष्ट्रवादी

Oct 2, 2015, 08:49 AM IST