राज ठाकरे

मुख्यमंत्री आणि राज ठाकरे आज गारपिटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गारपिटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्री गारपीटग्रस्त भागाची पहाणी करणार आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्या पार्श्वभूमिवर हा दौरा होत असून गारपीटग्रस्तांसाठी स्पेशल पॅकेज जाहीर होणार का? याकडे गारपिटग्रस्त शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. 

Dec 14, 2014, 10:37 AM IST

नाराजांवर राज ठाकरे अधिक आक्रमक, नाशिकच्या दौ-याकडे लक्ष

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नाराजांचा पुढचा पेपर सोडवायचाय तो नाशिकमध्ये. राज ठाकरे उद्या नाशिकच्या दौ-यावर जातायत. आता येत्या शनिवारी राज ठाकरे मुंबईच्या नगरसेवकांना घेऊन नाशिकच्या दौ-यावर जाणार आहेत. नाशिकच्या विकासकामांचा हा आढावा दौरा असणार आहे. अर्थात तिथेही नाराजांची फौज तयार आहेच. पण राज ठाकरेंनी सध्या तरी नाराजांबद्दल गेले तर जाऊ देत, असंच धोरण स्वीकारलंय़.

Dec 11, 2014, 10:07 PM IST

मनसेतून बाहेर पडलेल्यांशी संबंध ठेवायचा नाही, राज ठाकरेंचे आदेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षातून बाहेर पडलेल्यांशी संबंध न ठेवण्याचे आदेश मनसे कार्यकर्तांना दिले आहेत. याचा पहिला ट्रेलर राज यांनी मुंबईतल्या मनसे नगरसेवकांच्या घेतलेल्या बैठकीत पाहायला मिळाला. 

Dec 11, 2014, 03:54 PM IST