मुख्यमंत्री

भाजपच्या भव्य-दिव्य शपथविधीची 'वानखेडे'वर तयारी!

भाजपच्या भव्य-दिव्य शपथविधीची 'वानखेडे'वर तयारी!

Oct 29, 2014, 10:13 AM IST

पारदर्शी आणि राज्याला विकासाकडे नेणारं सरकार देऊ - फडणवीस

आज भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाली. त्यानंतर देवेंद्र आणि त्यांच्या कोअर कमिटीनं राज्यपालांकडे सरकार बनविण्याचा प्रस्ताव सादर केला.

Oct 28, 2014, 08:24 PM IST

पाहा कोण आहेत देवेंद्र फडणवीस?

‘माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळं मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असं आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलानं आईला बजावून सांगितलं. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावं लागलं. संघ, जनसंघाच्या संस्कारांचं बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज मुख्यमंत्री.  त्याचं नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. सोशल मीडियामध्ये गेले काही महिने ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा आज प्रत्यक्षात अवतरली आहे. 

Oct 28, 2014, 06:02 PM IST

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!

स्वच्छ प्रतिमा आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषणवणारे फडवणीस हे विदर्भातील चौथे नेते आहेत.

Oct 28, 2014, 05:39 PM IST

मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे - एकनाथ खडसे

मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे - एकनाथ खडसे

Oct 28, 2014, 02:54 PM IST

'मी शर्यतीत', नाथाभाऊंचा मुख्यमंत्रीपदावर दावा

मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे. सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्यांमध्ये देवेंद्र फडणवीस याचं नाव जवळ-जवळ निश्चित झालं असल्याचं सांगितलं जातंय, अशा वेळी एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्यानंतर पक्षाची अडचण होण्याची शक्यता आहे.

Oct 28, 2014, 01:57 PM IST