मुख्यमंत्री

जनतेची कामं टाळणाऱ्या 'सरकारी बाबूंना' दणका?

जनतेला सेवा न देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असणारा कायदा आणण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. जे अधिकारी वेळेत सेवा पुरवतील त्यांना बक्षिस देण्याचीही तरतुद या कायद्यात असणार आहे. 

Jan 27, 2015, 09:34 PM IST

बाबूंच्या हलगर्जीपणाचा कळस! मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पोहोचवलंच नाही

महाराष्ट्र सदनातल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणाचा कळसच गाठलाय. निवासी आयुक्त आणि राजशिष्टाचार आयुक्तांनी झेंडावंदनाला दांडी मारल्याची घटना समोर आल्यानंतर आणखी एक कारनामा उघड झालाय. 

Jan 26, 2015, 08:21 PM IST

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदनालाही वादाचं गालबोट

देशभरात ६६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा होत असताना, महाराष्ट्र सरकारनं आपलं नाक कापून घेतलं. महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्रमात आज चक्क ६५ वा प्रजासत्ताक दिन असल्याचा उल्लेख होता. हे कमी झालं म्हणून की काय, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदन सोहळ्यालाही वादाचं गालबोट लागलं.

Jan 26, 2015, 06:51 PM IST

अपंग व्यक्ती म्हणजे देवाची चूक - मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर बरळलेत. अपंग व्यक्ती म्हणजे देवाची चूक असून सामाजिक संस्था ती चूक दुरुस्त करतात असं धक्कादायक विधान पार्सेकर यांनी केलंय.

Jan 23, 2015, 01:38 PM IST

शिवसेना - भाजप यांच्यातील नवा वाद, मुख्यमंत्री टार्गेट

शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशाराही दिलाय. आम्ही मराठी माणसावर अन्याय खपवून घेणार नाही. नाहीतर आम्ही संघर्ष करु, असा इशारा शिवसेनेने दिलाय. त्यामुळे भाजप-शिवसेना यांच्यातील नवा वाद पुढे आलाय.

Jan 23, 2015, 08:36 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या काकी शोभाताईंचे नागपुरात टोलविरोधात आंदोलन

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकी शोभा फडणवीस आज नागपुरातल्या टोलनाक्यांविरोधात आंदोलन पुकारले. टोलनाक्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्तारोको केला.

Jan 21, 2015, 11:31 AM IST

किरण बेदी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार

अखेर भाजपने दिल्लीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी या भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. 

Jan 19, 2015, 11:48 PM IST