'हा' भारतीय फलंदाज त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही शून्यावर झाला नाही आऊट!

Unique Cricket Records: क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक महान फलंदाज झाले आहेत ज्यांनी अनेक विक्रम केले आहेत. पण, तुम्हाला माहित आहे का की असे काही भाग्यवान फलंदाज आहेत जे त्यांच्या कारकिर्दीत कधीही शून्यावर बाद झाले नाहीत.   

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 5, 2025, 10:23 AM IST
'हा' भारतीय फलंदाज त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही शून्यावर झाला नाही आऊट! title=

Batsmen Who Never out on duck in ODI Career: क्रिकेटचा खेळ हा अतिशय वेगळा खेळ आहे ज्यात कधी काय होईल सांगता येत नाही. या खेळात अनेक विक्रमही होतात. क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक महान फलंदाज झाले आहेत ज्यांनी धावा आणि शतके झळकावली आहेत, शिवाय असे अनेक बॉलर्स आहेत ज्यांनी विक्रमी विकेट्स घेतल्या आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की असे काही दमदार फलंदाज आहेत जे त्यांच्या कारकिर्दीत कधीही शून्यावर बाद झाले नाहीत. या यादीमध्ये एक भारतीय फलंदाजही आहे जो आपल्या कारकिर्दीत कधीही शून्यावर बाद झाला नाही. हा खेळाडू वर्षानुवर्षे भारतासाठी क्रिकेट खेळला पण तो कधीही शून्यावर बाद झाला नाही.

टीम इंडियाचा हा हिरो क्रिकेटर कधीच झाला नाही शून्यावर आऊट

भारतीय क्रिकेट संघाचा एक असा खेळाडू आहे जो त्याच्या कारकिर्दीत कधीही शून्यावर बाद झाला नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा फलंदाज कोण आहे. हा फलंदाज  दुसरा कोणी नसून माजी अनुभवी खेळाडू यशपाल शर्मा आहे. होय, यशपाल शर्माने 42 एकदिवसीय सामन्यांमध्ये 883 धावा केल्या आहेत.  शिवाय त्याने 4 अर्धशतकेही केली आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या ८९ धावा आहे. हा भारतीय फलंदाज एकदिवसीय सामन्यात कधीही शून्यावर बाद झाला नाही. आता हा फलंदाज या जगात नाही.

हे ही वाचा: Video: राहुल द्रविडच्या कारला अपघात; लोडिंग ऑटोने धडक देताच भर रस्त्यात बाचाबाची

 

यशपाल शर्मा सोडून या खेळाडूंचाही आहे यादीत समावेश 

पीटर क्रिस्टन (दक्षिण आफ्रिका)

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज पीटर ख्रिश्चन तीन वर्षे क्रिकेट खेळला, पण हा फलंदाज कधीही शून्यावर बाद झाला नाही.

हे ही वाचा: क्रिकेटरशी लग्न करण्यासाठी 'ही' टीव्ही रिपोर्टर झाली मुस्लिम, प्रेमासाठी तोडली धर्माची भिंत! 

 

केप्लर वेसेल्स (दक्षिण आफ्रिका)

हा फलंदाज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांसाठी खेळला आहे, त्याचे नाव आहे केपलर वेसेल्स. वेसेल्स त्याच्या कारकिर्दीत कधीही शून्यावर बाद झाला नाही. तो 7 वेळा नाबाद राहिला आहे.

हे ही वाचा: मोडकळीस आलेलं घर ते दुबईतील आलिशान बंगला,'या' व्यक्तीचा झिरो ते करोडोंच्या मालमत्तेचा मालकांपर्यंतचा प्रवास देईल नवीन ऊर्जा

 

जॅक रोडॉल्फ (दक्षिण आफ्रिका)

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जॅक रॉडलफच्या एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च धावसंख्या 81 आहे आणि तो आजपर्यंत शून्यावर आऊट झालेला नाही.